पर्यटकांसाठी 24 तास आरोग्यसेवा मिळाव्यात

सातारा : कठापूर (ता. कोरेगाव) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विश्‍वविक्रमी कवी जगन्नाथ जिजाबा केंजळे यांच्या विविध चार काव्यग्रंथांचा प्रकाशन सोहळा येत्या गुरूवारी, दि. सहा रोजी सातार्‍यात होणार आहे.
पोवई नाक्यावरील जिल्हा सैनिक कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात गुरूवारी सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सुवर्णप्रभात हे खंडकाव्य, तसेच हाक, अंतर्यामी गुंज आणि रसवंती हे काव्यग्रंथ या श्री. केंजळे यांच्या साहित्यनिर्मितीचे प्रकाशन या कार्यक्रमात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी, तसेच जिल्ह्यातील विविध मान्यवर साहित्यीकांच्या उपस्थितीत होणार आहे.
या चार साहित्यकृतींच्या निमित्ताने केंजळे यांच्या आजवर 21 ग्रंथनिर्मिती साकार झाल्या असून या कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन अक्षरा पब्लिकेशन्सचे जयंत लंगडे व केंजळे कुटूंबियांतर्फे करण्यात आले आहे.
वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या सदाबहार कवी केंजळे यांच्या काव्यसंग्रहांची नोंद विश्‍वविक्रमी ग्रंथांमध्ये झाली असून त्यांच्या प्रत्येक पुस्तकामध्ये कमीत कमी हजार कविता समाविष्ठ असतात. तसेच त्यांच्या एका एका काव्यग्रंथाचे वजन 24 किलोपर्यंत असते, अशी त्यांची ख्याती आहे. त्यांचे काव्यसंग्रह पृष्ठांच्या संख्येत नव्हे, तर किलो ग्रॅम या वजनाच्या परिमाणात मोजावे लागतात, अशी त्यांची वेगळी ओळख असून माजी सैनिक, कृषीनिषठ शेतकरी, शासनमान्य गुप्तहेर, चित्रकार, संशोधक, अभियंता असे त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे विविध पैलूही आहेत. या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने होेत असलेल्या अनोख्या साह्त्यिीक उपक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन अक्षरा पब्लिकेशन्सने संयोजकांच्यावतीने केले आहे.