प्राईड ऑफ नेशन पुरस्काराने सौ.राजश्री मेनकुदळे सन्मानित

साताराः इंटरनॅशनल कल्चरल अ‍ॅण्ड सोशल फोरम,या संस्थेने आयोजित केलेल्या इंडो – थाय लिटरेचर अ‍ॅण्ड कल्चरल कॉन्फरन्स – 2018 च्या बँकाँक मधील अध्यक्ष डॉमिनिक डेशमीर मॉडर्न इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य यांनी प्रा.सौ.राजश्री मेणकुदळे यांना ,प्राईड ऑफ नेशन हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.
या वेळी डॉ योगेश जोशी , निहीते सर ,डॉ.राज परब सर ,व प्रि.सौ.ज्योती परब मॅडम कार्यक्रमास व्यासपिठावर उपस्थित होते.सौ.राजश्री मेणकुदळे , ठाणे यांनी आठवणीतील कविता मध्ये स्वतःरचलेल्या कवितेचे सी इंडिया चॅनल वर वाचन व गायन केले व , द ब्लिसफुल गोल ऑफ लाईफ हा इंग्रजी भाषेत त्यांनी लिहिलेला श्रीमत् काशी जगद्गुरु प्रवचनावरील अनमोल ग्रंथ सादर केला. तसेच ऑक्टोबर 18 मध्ये ,ठाणे महानगरपालिकेने सौ.राजश्री मेणकुदळे यांना त्यांच्या साहित्यातील व सांस्कृतिक आणि सामाजिक सेवेबद्दल गौरवपत्र व स्मृतिचिन्ह देऊन ,गडकरी रंगायतन येथे गौरवित केले.
या शिवाय त्यांनी अनेक लेख, कविता,कथा लिहिल्या असून त्या विविध ठिकाणी प्रकाशितही करण्यात आलेल्या आहेत.सौ राजश्री मेणकुदळे यांच्या यशाबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.