पुणे ते गोवा 550 कि.मी. च्या सायकल स्पर्धेत सातारचा युवक तुषार भोईटेने पटकावले विजेतेपद 

सातारा : आर.सी.सी. सायकलिंग पुणे ग्रुपने व डेक्कन लॉन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे ते गोवा 550 कि.मी. दोन दिवसाची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत सातारा येथील सायकल खेळाडू तुषार पांडुरंग भाईटे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. त्यांना रोख 10 हजार, स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत गुजरात, पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणाहून मोठ्या संख्येने सायकल स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत कोल्हापूर येथील सायकलस्वार आदित्य शिंदे याने प्रथम क्रमांकाचे 35 हजाराची सायकल, स्मृतिचिन्ह, मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय क्रमाकाचा 15 हजाराचा पुरस्कार व स्मृतीचिन्ह कोल्हापूर येथील सायकल स्वार अक्षय चौगुले यांनी मिळविला.
विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. दरम्यान, विजेत्या सायकलस्वार तुषार भोईटे यांचे अमर सायकल एजन्सीचे खेळाडू अशिष जेजुरीकर, सचिन घोरपडे धनंजय जगताप, विशाल बाबर,राहूल निंबाळकर आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.