पुसेगाव विद्युत महावितरणचा भोगळ करभार हजारो रुपये बिल आल्याने शिवसेना आक्रमक

पुसेगाव : पुसेगाव मध्ये ज्या नागरीकांना सर्वसाधारण दोनशे तिनशे बील येते अशा नागरीकांना चक्क पाच ते आठ हजार रूपये बिल आल्याने सर्व नागरकांच्या संतापाचे वातावरण निर्माण झाले. ही बाब शिवसेना खटाव तालुका प्रमख प्रताप जाधव यांना समजताच शिवसेनेचा माध्यमातुन सर्व नागरीक,महीलांना पुसेगाव विघुत महावितरणच्या कार्यालयास घेराव घातला. अचानाक बिल वाढल्याने नागरीकांच्या असंतोष पसरला होता पुसेगाव विजवितरण कंपणीचे अधिकारी श्रीयुत म्हात्रे यांना समाधन कारक उत्तर देता न आल्याने खटाव येथिल वरीष्ठ अधिकारी श्री किरण डोईफोडे यांना पुसेगाव पोलीसस्टेशनमध्ये बोलण्यात आले. मिटरचे फोटो काढन बिले तयार करण्याचे काम महावितरण कंपणी टेंडर पध्दतीने दुसर्‍याला दिले असल्याने ही आमची जबाबदारी नाही असे उत्तर देताच शिवसेना खटाव तालुक प्रमख प्रताप जाधव आणि सर्व महीला आक्रमक झाल्या.
यावेळी प्रताप जाधव म्हणाले जोपर्यंत महावितरण कंपणी विज बीले कमी करून देत नाही तोपर्यंत कोणीच बिले भरायची नाहीत. या बिलातील 50 टक्के लोकांच्या बीलावरती मिटरचा फोटोच नसताना कोणत्या आधार ही विजबीले काढण्यात आले याचे उत्तर महावितरणने द्यावीत. जर दोन जर हे बिल दुरूस्त झाले नाहीतर शिवसेना कोणत्याही अधिकारी व कर्मचार्‍यास कार्यलाय बसु देणार नाही असा इशारा दिला
यावेळी महावितरणचे अधिकारी किरण डोईफोडे म्हणाले. काही तांत्रिक चुका झाल्याने सर्वच बिले चुकली असुन नागरीकांनी संयम ठेवावा
संबधिक ठेकदारवर महावितरणच्या माध्यमातुन योग्य ती कारवाई केली जाईल येत्या दोन दिवसात सर्व विज बिले दुरूस्त करून दिली जातील. यावेळी शिवसेनाचे शिवसैनिक सुरज जाधव,शहाजी देवकर,वनिता जाधव,सौ आतार,सुमित्रा शेडगे, शैला पवार, मधुकर टिळेकर,हितेश फडतरे,संजय गोरे,पोपटराव जाधव,सचिन गवळी,राहुल जाधव,विकास जाधव,अमित मोरे,प्रकाश पवार,यांच्यासह अनेक नागरीक उपस्थित होते
यावेळी पुसेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक श्री वाघ यांनी सांमज्याने मार्ग काढल्याने हा वाद जास्त चिघळला नाही.