पुसेसवाळीवर आता सीसी टीव्हीची करडी नजर

पुसेसावळी : खटाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशील आणि महत्वाच्या समजल्या जाणार्‍या व सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्याच्या सरहद्दीवर येणार्‍या पुसेसावली गावातील मुख्य दत्त चौक येथे ग्रामपंचायतीच्या स्व निधीतून सी. सी. टिव्ही यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली.
वडूज दहिवडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या यंत्रणेचा उद्घाटन कार्यक्रम झाला.राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशिल असणार्‍या व तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचे गाव असलेल्या गावांमध्ये अनेक छोटे मोठे अपघात, चोरी व काही बेकायदेशीर बाबी नित्यानेच घडत असलेणे पुसेसावळी च्या सरपंच सौ. मंगलताई पवार व त्यांच्या सहकारी सदस्यांनी ग्रामपंचायत स्व निधीतून पुसेसावळी दत्त चौक येथील मुख्य ठिकाणी अतीउच्च तंत्रज्ञानाचे चार सी. सी. टिव्ही कॅमेरे बसवण्याचा विचार केला.व त्याचे फुटेज दुरक्षेत्र पुसेसावळी येथे कार्यन्वित करण्यात आले आहेत. याकामी पोलीस यंत्रणेचे मोठे सहकार्य लाभले. यावेळी पुसेसावळी चे पोलीस निरीक्षक .विलास कुबडे जि.प.चे समाज कल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड धैर्यशिल कदम, जि. प. सदस्या सुनिता ताई कदम, पं.स.सदस्या जयश्रीताई कदम, पुसेसावळीच्या सरपंच सौ. मंगलताई पवार, ग्रा.पं.सदस्य नितीन वीर, अमोल कदम, आबासाहेब जगताप, संदिप लोखंडे,श्रीकांत पाटील, अरविंद कांबळे, ज्ञानदेव पवार, अमित वीर, संतोष कांबळे, ग्रामविकास अधिकारी श्री भोसले ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.उपस्थितांचे आभार भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी मानले.
यावेळी पुसेसावलीच्या सरपंच मंगलताई पवार म्हणाल्या की सातारा- सांगली आणि कराड- फलटण या प्रमुख शहरांना जाणार्‍या मार्गावर पुसेसावळी येथील दत्त चौकामध्ये ग्रामपंचायतीने स्व निधीतून सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत यामुळे अनेक फायदे होणार असून परिसरात चोर्या व इतर गुन्ह्याचा तपास लावणे आता सोपे होईल.