रहिमतपूर करांच्या सेवेत पालिकेच्या तीन घंटागाड्या दाखल

रहिमतपूरः स्वच्छ भारत अभियानाला अधिक गती येण्यासाठी रहिमतपूर करांच्या सेवेत पालिकेच्यावतीने चारचाकी तीन नविन घंटागाड्या दाखल नुकत्याच झाल्या आहेत. या नविन पालिकेने खरेदी केलेल्या या नविन घंटागाड्यांचे पूजन मुख्याधिकारी विनायक औंधकर, नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपनगराध्यक्ष विद्याधर बाजारे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक सुनील माने यासह मान्यवरांच्या हस्ते झाले.
नगराध्यक्ष आनंदा कोरे म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानांतर्गत कमिटी येत्या नजिकची काळात भेट देणार आहे. शहरातील प्रत्येक प्रभागातील ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सकाळी-संध्याकाळी कचरा गोळा केला जात आहे. कचरा डेपोच्या ठिकाणी ओला कचरा, सुका कचरा याचे प्रकल्प उभे केले असून या प्रकल्पाच्या माध्यमातून कंपोस्ट खत तयार होत आहे. शहरातील शेतकरी वर्ग या कंपोस्ट खताचा वापर करीत आहे. ही बाब कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनीही नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाला प्रतिसाद देत आपला परिसर व शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी नगरसेवक शशीकांत भोसले, शिवराज माने, रमेश माने, नगरसेविका सौ. निता माने, सौ. ज्योत्स्ना माने, सौ. सुनिता पवार, सौ. सुरेखा माने,सौ. पद्मा घोलप, सौ. सुजाता राऊत, बेदील माने, निलेश माने यासह एस.टी.भोसले, माजी उपनगराध्यक्ष दिलीप कदम यासह नागरीक, पालिका कर्मचारी उपस्थित होते.