रहिमतपूर पंचक्रोशी साहित्य संंमेलनास प्रारंभ

रहिमतपूरः रहिमतपूरचे सुपूत्र जेष्ठ नाटककार,गोपु देशपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात यावे यासाठी रहिमतपूरकर पंचक्रोशीतील नागरिकांनी साहित्त्यिक,सांस्क्रतिक ,कला,नाटयमहोत्सव यासारखे उपक्रम राबविले जावेत याकरिता वाचन संस्क्रती,बालनाट्य,बडबडगीते,चित्रकला,शिल्पकला,निबंधस्पर्धा,वक्त् त्व स्पर्धा,काव्यवाचन,कथाकथन,आदी उपक्रम राबवून साहित्य क्षेत्रातील व्यक्तींच्या आठवणींना उजाळा देणे ही आजच्या काळाची गरज आहे असे प्रतिपादन जेष्ठ पुरोगामी विचारवंत व प्रयोगशील नाट्यकर्मी पंचक्रोशी साहित्य संमेलनाचेअध्यक्ष अतूल पेठे यांनी केले. ते रहिमतपूर येथील पंचक्रोशी साहित्य संमेलनाच्या उदघाटन समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते
यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष विद्याधर बाजारे, जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक सोपानराव घोरपडे,पंचक्रोशी शिक्षण संस्थाअध्यक्षा सौ.चित्रलेखा माने-कदम,प्रा.हिंदुराव पवार,प्रा.चंद्रहार माने,अड विकास देशपांडे,प्रा.भाग्यश्री जाधव,स्वागताध्यक्ष अवनिश माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना अतुल पेठे पुढे म्हणाले की,मी रहिमतपूर येथे चौथ्यांदा आलो आहे. जेष्ठ नाटककार गो पु देशपांडे यांचे सत्यशोधक हे नाटक अतरराष्ट्रीय स्तरावर खूप गाजले ते नाटक रहिमतपूर येथे सादर करण्यात आले तेव्हा गो पु म्हणाले की ,मी भरुन पावलो ज्या मातीत मी वाढलो खेळलो बागडलो ,माज्या स्वत:च्या जन्मगावी होण हे किती मोलाचेआहे. आपली स्वत:ची साहित्यक्रती देण्याचा आनंद वेगळाच असतो.आजच्या मुली ह्या सावित्रीबाई फूलेंच्या वंशजआहेत त्यामुळेच स्मृती येवले नी कुस्तीस्पर्धेत धोबीपछाड करून सुवर्णपदक मिळवले.रहिमतपूरची माणसे ही भारतभर आहेत.समाजस्वास्थ नाटकावेळी मला येण्याचा योग आला त्यावेळी समाजस्वाथ्य नाटक सुरू असताना शेवटची पंधरा मिनिटे बाकी असताना धो धो पाऊस आला.नंतर तोच भाग एका व्हरांड्यात सादर करण्यात आला मराठी रंगभुमित पाऊस प्रयोग थांबला नाही महाराष्ट्रात हे प्रथमच घडले. ञानाची केंद्रे म्हणजे वाचनालये,शिक्षणकेंद्रे,शिक्षणाच महत्व जाणले पाहीजे,ञानाची गंगा पुढे वाहात गेली पाहीजे.त्यासाठी युवकांनी,युवतीनी वाचन करणेही काळाची गरज असून त्यातूनच तुम्ही पुढेजावू शकता आपले करिअर घडवू शकता.आज नविन वर्षाची ग्रंथदिंडी खांद्यावर घेतली आहे.यावेळी त्यांनी भारतीय संविधानाचा विजय असो,फुले शाहू आंबेडकर आम्ही सगळे दाभोळकर अशा घाषणा दिल्या त्याला विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. अतुल पेठे पुढे म्हणाले की,योग्य गोष्टींसाठी ,आपल्या आधिकारासाठी आपला आवाज बुलंद हवा. युवतींनी भरपूर वाचले पाहीजे. रहिमतपूरची परंपरा कायम राखत नवीभाषा वापरायची असेल तर समाजातले प्रश्न,आजुबाजूचे प्रश्न,दाभोळकर पानसरे निर्घृणहत्या, ह्या समाजातील अंधश्रध्दा दूर झाली पाहीजे हा ध्यास कलबुर्गी,पानसरे दाभोळकर यांनी घेतला होता. तुकारामांचे अभंग ज्यांच्या मुखी रुळले गेले ते पुन्हा लिहून काढले तर तत्कालीन वैदिक ब्राम्हणांनी इंग्रजीमध्ये रचल्या. त्यावेळी तुकाराम महाराजांनी तेरा दिवसांचा उपवास केला.त्यांच्या अभिव्यक्ती साहित्यावर गदा आली.माझ्या हक्कावर कुणीतरी घाला घालतय ही झाली दंतकथा खरी गोष्ट काय तर तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये जोअर्थ होता तुकारामांची अभंग ज्याच्या मुखी रुळले त्यांनी परत लिहून काढली ही सगळ्यात मोठी क्रांती आहे.महाराष्ट्रात सांस्कृतिक ,राजकीय,सामाजिक दुष्काळ आहे तुकाराम चोखामेळ्यांचे अर्थ समजून घेतले नाहीत बालविवाह, सतीची चाल अनेक लोकांनी बंद पाडली.पुण्यामध्ये महात्मा फूले, सावित्रीबाई फूले यांनी मुलींच्या शिक्षण मिळावे म्हणून लोकांचे दगड शेणखाल्ले ते, आजच्या युवतींना भारतभर कुठेही मिळू शकते
ही परंपरा जपण्यासाठी रहिमतपूर शहर महत्वाचे आहे आजच्या शिक्षकांनी थकून चालणार नाही नदीचे पाणी बदलत असते.आजच्या काळातील बदल निट समजून घेतले पाहीजेत.
बदलत्या काळाला अनुसरून चांगल्या वाचनाने चांगले ऐकण्याने मनावर परिणाम होतात आपल्याला आत्महत्या करावीशी वाटत नाही आपल्या शिक्षणातून आपले जग समजावून घेऊ शकतो, साहित्यिक,संगीत,मूर्तीकला, शिल्पकला, वेगवेगळ्या कला अवगत करता येतात.फक्त आपले विचार फौंडेशन घट्ट असले पाहीजे तुमची दु:ख काय आहेत ते कळेल अनेक कविता अर्थहीन असतात.चांगले नाटक बघितल्याने चांगले विचार बनतात.नरहर कुरूदकर,साने गुरूजी व्याख्यानमाला,सरदार बाबासाहेब माने,कुसूमावतीदेवी माने व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. हा स्तुत्य उपक्रम आहे तो सतत चालू ठेवावेत नव्या वर्षाचा संकल्प करून बालहत्या,मुलींवर अत्याचार झाला नाही पाहीजे हा दृढसंकल्प सर्वांनी केला पाहीजे.गो पु देशपांडे यांच्यानावाने नाट्योत्सव दरवर्षी सुरू करण्यात यावा अशी गाव आता उरली नाहीत स्वातंत्र्य, समता, बंधुता राखत अविवेकाची काजळी दूर करूया आधिकाधिक विवेकी बनूया असेही ते म्हणाले. यावेळी सौ चित्रलेखा माने-कदम,अवनिश माने यांची भाषणेझाली.
याआधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर ते गांधीचौक ते संमेलन स्थळ संविधान पोवाडा गीत व ग्रंथदिडीचे पूजन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.यावेळी पंचक्रोशीतील नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक पालक बहुसंख्येने उपस्थित होते.