राजसाहेब ठाकरे गुरुवारी सातारा दौर्‍यावर ; पदाधिकारी मेळाव्याद्वारे संदीपदादांच्या नेतृत्वाखालील आंदोलनांना बळ लाभणार

सातारा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे येत्या गुरुवारी (दि. 1 फेब्रुवारी) मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी सातारा दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यादरम्यान मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलनांना बळ लाभणार असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहे. 
सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये गुरुवारी सकाळी 11 वाजता मनसेचा पदाधिकारी मेळावा होणार आहे. राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी जिल्हयातून येणार्‍या महाराष्ट्र सैनिकांसह नागरिकांच्या सोयीसाठी सभागृहाबाहेर मोठया एल.ई.डी. स्क्रिनवर विचार ऐकण्याची व राजसाहेबांना पाहण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात येत आहे.
राजसाहेबांच्या दौर्‍यामुळे मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून पदाधिकारी मेळावा व राजसाहेबांच्या दौर्‍याची तयारी युध्दपातळीवर सुरु झाली आहे.
राजसाहेब जाहिर कार्यक्रमासाठी प्रथमच सातार्‍यात येत आहे. राजसाहेबांच्या जिल्हयातील स्वागताचे नेमके व नेटके नियोजन सुरु असून जिल्हयाच्या सरहद्दीवर शिरवळसह महामार्गावर ठिकठिकाणी त्यांच्या जोरदार स्वागताचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सैनिकांसह नागरिकांनी व विविध आंदोलनांमध्ये अग्रेसर राहणार्‍या जिल्हयातील सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांनी केले आहे.
दरम्यान महात्मा फुलेंची कुलभ्ाूमी कटगुण ते सातारा अशी क्रांतीज्योतही आणण्यात येणार आहे. तसेच मनसेचे नूतन सरपंच व सदस्यांचे सत्कारही यावेळी करण्यात येणार आहेत.
राजसाहेबांच्या या दौर्‍यामुळे महाराष्ट्र सैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून कार्यक्रमाची तयारी मोठया उत्साहात सुरु आहे.