अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवजागर कार्यक्रमाचे उदघाटन 

(छाया : प्रमोद इंगळे)
सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवशाहीचे दर्शन घडविणार्‍या शिवजागर कार्यक्रमाचे उदघाटन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, राजमाता कल्पनाराजे भोसले, दमयंतीराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, पंकज चव्हाण, सुनील काटकर, गीतांजली कदम, रंजना रावत यांसह मान्यवर उपस्थित होते.
खासदार उदयनराजे भोसले कल्चरल फौंडेशन व पंकज चव्हाण डान्स अकॅडमी सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातारा राजधानी महोत्सवाला आज पासून सुरुवात झाली. तीन दिवस चालणार्‍या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राजधानी महोत्सवासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना देखील निमंत्रण दिलेले आहे. आज पहिल्या दिवसाची सुरवात शिवशाहीचे दर्शन घडविणारा शिवजागर कार्यक्रमाने झाली. यामध्ये छत्रपती शिवरायांची जीवनगाथा, लाठीकाठी खेळ, शिवकालिन शस्त्र प्रदर्शन, मर्दानीखेळ युवक युवतीनी दाखविले.