राजमाता श्री. छ. सुमित्राराजे उद्यानाच्या नुतनीकरणानंतरचा उद्या उद्घाटन सोहळा

सातारा : केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गंत, सदरबझार येथील राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे उद्यानाच्या सुसज्य नुतनीकरणाचा उद्घाटन सोहळा, सातारचे लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक 02 मार्च 2019 रोजी ठिक सायंकाळी 5.00 वांजता, होणार असून, या उठावदार नुतनीकरणाचे सोहळयास सदरबझार परिसरातील नागरिकांसह, सातारवासियांनी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन सातारा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक निशांत पाटील यांनी नगरपरिषदेच्या वतीने केले आहे.
निशांत पाटील यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, सातारा पेठ सदरबझार हा संमिश्र लोकवस्तीच्या भागात सुमित्राराजे भोसले उद्यान सातारा नगरपरिषदेने उभारलेले आहे, तथापि या उद्यानाचे नुतनीकरणाची आवश्यकता निर्माण झाली होती, सदरबझार वासियांसाठी एक चांगले उद्यान असावे म्हणून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या सूचनेनुसार, या भागातील नगरसेवक या नात्याने, सहकारी नगरसेविका सौ.रजनी जेधे यांचेसहकार्याने, सुमित्राराजे उद्यानाचे नुतनीकरण केंद्र शासनाच्या अमृत योजनेमधुन करण्याबाबत मी प्रस्तावित केले. प्रस्तावानुसार या उद्यानाचा अमृत योजने समावेश करण्यात आल्यावर, उद्यानाच्या नुतनीकरणाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.
या उद्यानात विविध प्रकारची फुलझाडे लावण्यात आली आहेत, त्यामध्ये लाल-पिवळी जास्वंद, रातराणी, सिंघोनिया, विविध प्रकारचे गुलाब, कर्दळ,मोगरा आदी फलझाडांची लागवड आवश्यकत्या मोठया प्रमाणात करण्यात आली आहे. या बागेत पूर्वी काही मोठे वृक्ष होते त्यामध्ये नवीन वृक्ष लावण्यात आले असून, सध्या या उद्यानात, नारळ, होस्टेल फॉक्स,फिस्टेल पाम, आंचल, बकुळा, कदंब, पिवळा चाफा डिडोनिया, ख्रिसमस ट्री, आदी मोठे वृक्ष उद्यानातील नागरिकांना सावली देणार आहेत.
बाळगोपाळांसाठी विविध प्रकारच्या खेळण्यांसह घसरगुंडया आणि झोपाळे बसविणेत आले आहेत, या खेळण्याच्या विभागात समुद्री रेती टाकण्यात आली आहे, समुद्री रेती मुळे या ठिकाणी मुलांना खेळताना कोणतीही इजा होण्याची शक्यता नाही. तसेच बागेच्या पश्‍चिमभागामध्ये मोठी लॉन्स तयार करण्यात आली आहेत, तसेच लॅन्ड स्केपिंग तयार करण्यात आले आहे. बागेत फिरण्यासाठी पेव्हर पाथ असून, जेष्ठ नागरिकांसह, नागरिकांना बसण्यासाठी ठिकठिकाणी 20 बेंचेस बसविणेत आले आहेत. तसेच संपूर्ण उद्यानात एकूण सहा हायमास्ट बसविणेत आले असल्याने, संध्याकाळी देखिल चांगली प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. उद्यानाच्या आतील बाजुच्या कडेला वॉकिंग ट्रॅक बनविण्यात आला आहे, सुमारे 300 मीटरच्या या वॉकिंग ट्रॅक मुळे सदरचा व्यायाम करणा-या नागरिकांना एक चांगली आणि सुरक्षित सुविधा निर्माण करण्यात आली आहे
उद्यानामध्ये अद्यावत स्वच्छतागृह, सुरक्षारक्षकांची निवास इमारत उभारण्यात आली आहे. याठिकाणी पूर्वीपासून एक विहिर आहे, तसेच नव्याने एक बोअर मारण्यात आली असून, विहिर आणि बोअरिंगच्या पाण्यावर ठिबक सिंचन पध्दतीने उद्यानातील लॉन,फुलझाडे आणि वृक्षवल्ली यांना चांगल्या प्रकारे पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या नुतनीकरणाकरीता अमृत योजनेमधुन रुपये 50 लक्ष आणि उद्यानातील इतर बांधकामे,फॅब्रीकेशन,रंगरंगोटी इ.कामांसाठी सुमारे 25 लाख असा एकूण सुमारे 75 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. उद्यानाची दैनंदिन देखभाल सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातुन करण्यात येणार असून, या उद्यानात सर्वांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. नुतनीकरणाचा उद्घंाटन सोहळा झाल्यावर दररोज सकाळी 6.30 ते 10.00 आणि सायंकाळी 4.00 ते 8.00 या वेळात सदरचे उद्यान सर्वांसाठी खुले राहणार आहे. या नुतनीकरण उद्घाटन सोहळयास मोठया संख्येने उपस्थित रहावे तसेच दररोज मुलांसह सर्वांनी उद्यानातील सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहनही नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष निशांत पाटील यांनी केले आहे.