रामकृष्ण वेताळ यांचा आज वाढदिवस

विविध कार्यक्रमांचे आयोजन
कराड : भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण वेताळ यांचा वाढदिवस 10 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. वाढदिवसानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
वेताळ हे सकाळी पाली येथे खंडोबा देवाचे दर्शन घेतील त्यानंतर कराड शहरातील महापुरूषांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर उद्घाटन आयुष्यमान आरोग्य योजना कार्ड वाटप, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे. दुपारी 12 ते सायंकाळी 7 पर्यंत ते शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत.
सर्व कार्यक्रमांचे आयोजन सुर्ली ता. कराड येथील त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले आहे. शुभेच्छा देण्यासाठी येताना हार, पुष्पगुच्छ आणू नयेत, असे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे. शालेय साहित्याचा मात्र स्वीकार केला जाईल. तसेच जमा होणारे सर्व साहित्याचे वाटप परिसरातील शाळेतील गरीब विद्यार्थ्यांमध्ये करण्यात येणार आहे.