राफेल प्रश्‍नी केंद्र सरकारची दिशाभुल :महाजन

कराड : राफेल विमान खरेदी प्रकरणी केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला खोटी माहिती सादर केली. या माहितीच्या आधारे उच्च न्यायालयाने हा विषय न्यायालयाच्या कक्षेत येत नसल्याचे सांगुन सदरची याचिका फेटाळली. असे असताना सरकार न्यायालयाने क्लिनचिट दिल्याचे सांगुन सर्वांची दिशाभुल करत आहे. राफेल प्रश्‍नी काँग्रसने संसदीय समितीच्या चौकशीची मागणी केली आहे. मात्र सरकार ही मागणी मान्य करत नाही. परंतु काँग्रेस या मागणीवर ठाम आहे. यापुढेही ही मागणी काँग्रेस संसदेत व संसदेच्या बाहेर लावुन धरणार असल्याचे काँग्रेसचे राज्यप्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी सांगितले. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँगेसचे अध्यक्ष आ.आनंदराव पाटील कराड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील, प्रदिप जाधव, झाकीर पठाण, अशोकराव पाटील, यांच्यासह कूँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान प्रथम रत्नाकर महाजन यंाचे स्वागत पुष्पगुछ देवुन आनंदराव पाटील यांनी केले.