Friday, April 19, 2024
Homeताज्या घडामोडीमहाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केले महाश्रमदान

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केले महाश्रमदान

वाई : महाराष्ट्र दिन हा कामगार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.सध्या महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या झळा तीव्र बसत असून तापमानात प्रचंड वाढ झाल्याने धरणे, तलाव, ओढे, विहिरी यातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होताना दिसत आहे. पर्यावरणाचा समतोल ढळत चालल्याने संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, जलसंधारणाच्या पाणी आडवा-पाणी जिरवा या अभियानांतर्गत किसनवीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शंभर विद्यार्थ्यांनी महाश्रमदान अभियान राबवून खर्या अर्थाने कामगार दिन साजरा केला.
वाई तालुक्यात जलसंधारणा विषयी व्यापक मोहीम हाती घेण्याची आवशक्यता असून त्याची सुरुवात किसनवीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी महाश्रमदानात सहभाग नोंदवून केली आहे, चित्रपट अभिनेते अमीर खान यांनी या उपक्रमाला प्राधान्य दिले असून महाराष्ट्रात पडणार्‍या दुष्काळावर मात करण्यासाठी हा केलेला प्रयत्न आहे, या समाज हिताच्या उपक्रमात सहभाग नोंदवून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी तरुणांना दिशा देण्याचे काम केले आहे. पाण्याचा प्रश्न सध्या जिव्हाळ्याचा झाला आहे. एक मिशन म्हणून किसनवीरच्या विद्यार्थ्यांनी सोळशी नायगांव या ग्रामीण भागातील गावांत येथील पाणी फौंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली नायगांव मधील ग्रामस्थांच्या मदतीने बांध बंधीस्थ बंधारा उभारण्यात मोलाचे सहकार्य केले. सकाळी सात वाजल्या पासून संपूर्ण दिवसभर पन्नास घनमीटर लांबीचा व एक मीटर रुंद व एक मीटर उंची असलेल्या बंधार्‍याची उभारणी करण्यात श्रमदान केले. त्यामुळे या परिसरात पावसाचे पडणारे पाणी साठविण्यासाठी मोलाचे सहकार्य मिळणार आहे, शेतात उभारण्यात आलेल्या या बंदिस्थ बंधार्‍यामुळे पिकाचे पाणी देण्याचे काम हलके तर होतेच शिवाय शेतात पाणी मुरल्याने परिसरातील विहिरींना पाणी वाढण्यासाठी मदत मिळते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी या श्रमदानात सहभाग घेतल्याने सोळशी नायगांव गावांतील शंभरहून अधिक ग्रामस्थांनी सुध्दा आपले योगदान दिले. हा उपक्रम राबविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी- प्रा. आनंद घोरपडे, प्रा. राजेश गावित, विद्यार्थी प्रतिनिधी- कु.दिव्या चौधरी व प्रकाश गोंजाळे, नायगावचे सरपंच- सौ.विमल सोळसकर, उपसरपंच- यशवंत धुमाळ, पाणी फौंडेशनचे अध्यक्ष- माधव सोळसकर, कालिदास धुमाळ, डॉ, अमित पवार यांच्यासह नायगांव ग्रामस्थांनी या महाश्रमदानात सहभाग घेतला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular