पुसेसावळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बुथ कमेटीची बैठक संपन्न

म्हासुर्णे (प्रतिनिधी  तुषार माने ): कराड उत्तर मतदार संघातील पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यानी आपआपल्या गावातील बुथ केंद्रानुसार मतदानाचे नियोजन, वाड्यावस्त्यावरील कार्यकर्ते व बाहेर गावी असणारे मतदार यांच्याशी संपर्क ठेवण्याचे काम केले पाहिजे असे मत आ.बाळासाहेब पाटील यांनी मांडले, ते पुसेसावळी (ता.खटाव) येथील बैठकीत बोलत होते.

यावेळी माजी.पं.स.सभापती देवराज पाटील,सह्याद्री संचालक संजय जगदाळे,माजी मार्केट कमेटी उपसभापती बबनराव कदम,पारगावचे शिवाजीराव पवार, उंचीठाणचे शिवाजीराव शिंदे, होळीचागावचे मा.पं.सदस्य भाऊसो लादे, पुसेसावळी उपसरपंच सुर्यकांत कदम,वडगावचे सरपंच संतोष घार्गे, राजाचे कुर्ले सरपंच समरजित राजेभोेसले, माजी मार्केट कमेटी उपसभापती अनिल माने, श्रीरंग शेठ माने, पं.स.उपसभापती धनाजी पावशे,वडगाव हुतात्मा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंतराव घार्गे, म्हासुर्णेचे महादेव माने चेअरमन राजु माने साहेबराव शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती,
पुढे बोलताना म्हणाले की आजच्या युगात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून युवकांना एकत्र करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देहधाेरणे समाजापुढे मांडणे गरजेचे असुन येणार्‍या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जी विकास कामे केली गेली आहेत ही तळागाळातल्या मतदारांपर्यंत पोहचली पाहिजेत यासाठी कार्यकर्त्यांनी
काम करणे गरजेचे आहे,
यासाठीच या बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे,
त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर काँग्रेसची जवळपास आघाडी निश्चित झालेली आहे,त्यामुळे काँग्रेस विचारांचे कार्यकर्त्याना एकत्रित सामावून घेणे गरजेचे आहे. तद्नंतर देवराज पाटील,समरजित राजेभोसले,भाऊसो लादे आदींची भाषणे झाले,
यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पिसाळ,
बजरंग पिसाळ,अविनाश घार्गे,पिंटू घार्गे,
विष्णूपंत पिसाळ,अशोक पिसाळ, मा.सरंपच संभाजी थोरात, अरविंद थोरात, रामचंद्र काटकर, सुनिल चन्ने, पै.बापुराव माने, चेअरमन रविंद्र कदम निवासराव पवार,पांडुरंग माने,आनंदराव कदम, दुटाळ सर ईस्माईल पटेल,नंदकुमार सोलापुरे,आनंदराव यादव, श्रीमंत (शेठ)कदम, आदि
तसेच पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी
काॅग्रेसचे गावोगावचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
या बैठकीचे प्रास्ताविक दत्तात्रय रुद्रुके यांनी केले,
तर आभार लक्ष्मणराव घार्गे यांनी मानले.