युवकांचे आशास्थान असणार्‍या निखिल (दादा) शिंदे यांना राष्ट्रवादीच्या युवक प्रदेश उपाध्यक्षपदी संधी मिळावी.

म्हासुर्णे( प्रतिनिधी तुषार माने) :-. देशाचे नेते, मा.खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, मा.अजितदादा पवार (माजी उपमुख्मंत्री), मा.खा. सुप्रियाताई सुळे व मा.जयंत पाटील साहेब (प्रदेशअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्वसामान्य घरातील युवक मा.मेहबूब शेख यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्याबद्दल निखिल दादा शिंदे फाऊंडेशनकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निखिल (दादा) शिंदे यांची निवड व्हावी, यासाठी सातारा जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील युवकांची मागणी सतत होत आहे.
निखिल शिंदे हे गेले अनेक वर्षे सामाजिक, क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते ही आहेत. युवा वर्गाला त्यांच्याकडून एक वेगळीच ऊर्जा मिळते. सतत लोकांत मिसळणे यासाठी ते प्रचलित आहेत.
“आदरणीय स्व. यशवंतरावजी चव्हाण साहेब” व राष्ट्रवादीचे नेते मा. खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांवर व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सामाजिक कार्याची घोडदौड नेहमी चालू असते.
सातारा तसेच सांगली कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात निखिल शिंदे यांचे मोठे योगदान असते. गोरगरिबांना आवश्यक ती मदत देण्यासाठी त्यांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, श्रवण यंत्र वाटप यासारखे विविध उपक्रम यशस्वीपणे राबवत निखिल शिंदे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांचे नेतृत्व युवकांचे आशास्थान आणि भक्कम संघटन कौशल्य या निखिल शिंदे यांच्या जमेच्या बाजू असून पक्ष बळकटीसाठी त्याचा निश्चितपणे उपयोग होईल.
निखिल दादांची काम करण्याची कार्यपध्दत ही युवकांना प्रेरणादायी ठरते, कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता निःस्वार्थ वृत्तीने फक्त हाती घेतलेल कार्य करीत राहणे हीच त्यांची ओळख.
पक्षाने अशा युवकाला संधी द्यावी ही भागातील युवकांची मागणी असून पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणे त्यांच्या जनसंपर्कातून सहजशक्य होणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात पक्षाने दिलेल्या संधीचे ते
नक्की सोने करतील. आज प्रतिकूल राजकीय परिस्थितीत पक्षाचे विचार अधिक जोमाने लोकांपर्यत पोहचवून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट होईल, त्यामुळे त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे.
अशी भावना निखिल दादा शिंदे फाउंडेशनचे कार्यकर्ते व युवकांन मधून पुढे येत आहे.