मराठा आरक्षण संदर्भात सातारा येथे जनसुनावणी

पाटण: मराठा आरक्षण संदर्भात दि. 18 मे 2018 रोजी शासकीय विश्रामगृह सातारा येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची जाहीर जनसुनावणी होत असुन या जनसुनावणीत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे तज्ञ सदस्य, सदस्य सचिव, व आयोगाचे अधिकारी यांची उपस्थिती राहणार असून या जनसुनावणीत मराठा समाज संस्था, संघटना, व्यक्तीशा यांनी पुराव्यांसह म्हणने मांडायचे आहे. असे आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हणले आहे. मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, व आर्थिक मागासलेपण जाणुन घेण्यासंदर्भात विभागवार जनसुनावणी घेऊन व्यक्ती, संघटना व सामाजिक संस्थेमार्फत माहिती संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सातारा जिल्हा कार्यक्षेत्रामधिल ज्या व्यक्ती, संस्था, संघटना यांना मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणा संबंधी आयोगासमोर निवेदन सादर करावयाचे आहे.
आणि आपले म्हणणे मांडायचे आहे. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांनी लेखी पुराव्यांसह व ऐतिहासिक दस्तावेजासह  किंवा माहितीसह  शुक्रवार दि. 18 मे 2018 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत शासकीय विश्रामगृह सातारा या ठिकाणी जनसुनावणी चे वेळी आयोगासमोर सादर करावित असे आवाहन सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे.