निवृत्तीनंतर गुरुजनांनी उर्वरीत आयुष्य समाजासाठी वेचावे : प्राचार्य अभयकुमार साळुंखे

सातारा : मुलगा ज्या मातीत जन्माला येतो, त्याच मातीत घडण्यासाठी पालकांनी स्थानिक मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल करावे आणि स्पर्धेच्या शाळेत दाखल करावे आणि स्पर्धेच्या तंत्रज्ञानाच्या युगात गुरुदेव कार्यकतर्यांनी मुल्याधिष्ठीत शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये रुजवावे असे आवाहन प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्युनि. कॉलेज परळी येथे प्राचार्य संभाजीराव पाटील, प्रा. पी. बी. पाटील, उपशिक्षक विश्‍वासराव सपकाळ, प्रयोगशाळा परिचर नरसिंग यादव यांचा सपत्नीक सेवागौरव समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे व माजी सहकार मंत्री विलासरावजी पाटील उंडाळकर (काका यांचे हस्ते झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व संस्थेच्या प्राथनेने झाली.
ज्ञानतपस्वी शिक्षणमहर्षी प. पू. डॉ. बापूजी साळुंखे सारख्या चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून शैक्षणिकदृष्ट्या बहुजन समाज कसा बदलत गेला त्याचे अनेक दाखले देत आजच्या पिढीने व गुरुजनानी केवळ कृतज्ञता व्यक्त न करता हा समाज उन्नत होण्यासाठी मोलाचे योगदान द्यावे असे प्रमुख पाहुणे विलासराव पाटील उंडाळकर यांनी आपले विचार प्रकट केले. शिवाय समाजाचे ही काही देणे लागतो याची जाणीव ठेवून निवृत्तीनंतर सेवाकार्यास वाहून घ्यावे, संस्थेशीही ऋणानुबंध जोपासावे अशी अपेक्षा व्यक्त केली. संस्थेचे पेट्रन सदस्य श्री गजाननराव बोबडे आपल्या भाषणात परळी संस्कृती केंद्र यापुढेही प्रगतीपथावर अग्रणी राहण्यासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत असे मत मांडले.
याप्रसंगी संस्थेचे सहसचिव डॉ अशोक करांडे, माजी सहसचिव (अर्थ) एस. के. कुंभार, माजी सहसचिव (प्रशासन) एन. जी. गायकवाड, आजीवसेवक पी. एन. देशमुख, जे. जी. वायदंडे, प्राचार्य ऐ. पी. पाटील, पेटून सदस्य गजाननराव कोठावळे सातारा जि. ख. वि. संघ संचालक गजाननराव दळवी, माजी सभापती नारायण कणसे, जावळी बँकेचे संचालक आनंदराव सपकाळ, म्हाते खुर्दचे सखारामबापू दळवी, पंचक्रोशी म्हाते ग्रामस्थ, नागठानेचे कृषीभूषण मनोहर साळुंखे, ग्रामस्थ परळी पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी, शाळांचे शालाप्रमुख, सत्कारमुर्तीचे नातेवाईक, स्नेही हितचिंतक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. वाय. निकम तर सुत्रसंचालन कुंभार एस. जे व कु. वायदंडे व्ही. एस. यांनी केले. शेवटी माने एम. बी. यांनी आभार व्यक्त केले.