उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना सातारा जिल्हा रिक्षा संघटनेतर्फे निवेदन

सातारा : रिक्षा व टॅक्सीची वयोमर्यादा निश्‍चित करुन गेल्या पाच वर्षापूर्वी काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आमचा विरोध राहील. याबाबतचे निवेदन मंगळवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा यांना सातारा जिल्हा रिक्षा संघाच्यावतीने दिले आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 16 वर्षावरील रिक्षा व टॅक्सीचे पार्सिंग रद्द करुन रिक्षा व टॅक्सी क्रॅप मध्ये काढण्यासाठी अप्पर परिवहन प्राधिकरण आयुक्त मुंबई यांच्या निर्णयाच्या कार्यवाहीस सातारा जिल्ह्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांचा विरोध आहे. शासण निर्णयाची अंमलबजावणी पाच वर्षानी राजकीय हेतूनेच केली असल्याचे आमचे मत आहे. याबाबत फेरविचार करावा व दिलासा द्यावा.
यावेळी सातारा जिल्हा रिक्षा वाहक संघाचे अध्यक्ष सिध्दनाथ भुजबळ, चिटणीस, विठ्ठल पोळ, बजीरंग गाडे, युनुस शेख, विकास रणपिसे आदी उपस्थित होते.
भारिपच्यावतीने निवेदन
शासनो 16 वर्ष पूर्ण झालेल्या अ‍ॅटो रिक्षांचे मान्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करु नये असे परिपत्रक काढले आहे, ते तातडीने रद्द करुन रिपासिंगचा नियम लागू करावा, या मागणीचे निवेदन मंगळवारी भारिप बहुजन महासंघातर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या देशामध्ये रोजगाराचा दुष्काळ पडला आहे, लोक आपला स्वतंत्र रोजगार म्हणून रिक्षा व्यवसायाकडे पाहतात. त्यामुळे रिक्षा व्यवसायातही स्पर्धा निर्माण झाली आहे. उत्पन्न कमी झाल्याने रिक्षा चालकांना कुटुंबाचे पालन पोषण करणे अशक्य झाले आहे. अशातच रिक्षा व्यावसायिकांनी 20 वर्षाचा पर्यावरण कर भरलेला आहे. त्यामुळे त्यांना 16 वर्षाची अट शितील करुन ती 20 वर्षाची करण्यात यावी व इतर वाहनांप्रमाणे 5 वर्षाची रिपासींगची तरतूद लागू करावी. यावेळी चंद्रकांत खंडाईत, गणेश भिसे, संजय साळुंखे, अरविंद्र सय्यद, विकी रणदिवे आदी उपस्थित होते.