जिहे-कठापूर योजनेस 800 कोटींचा निधी मंजूर

महेश शिंदे यांच्या प्रयत्नास यश
पुसेगाव : खटाव तालुक्याची महत्त्वाची असणारी जिहे कठापूर उपसा योजना गेली पंधरा वर्षे झाली रखडली होती. या संदर्भात भाजपा नेते महेश शिंदे आणि गुरूवर्य लक्ष्मण इनामदार चारीटेबल ट्रस्ट यांच्या प्रयत्नामुळे जिहे कठापूर सिंचन योजनेस  800 कोटीचा निधी मंजूर झाल्याची माहिती महेश शिंदे यांनी पत्रकार परीषदेते सांगितले.
यावेळी महेश शिंदे म्हणाले आघाडी सरकाराने खटाव माण च्या जनतेला गेली पंधरावर्षे पाण्यासाठी झुलवत ठेवले. विद्यमान आमदार जलसंपदा विभागाचे मंत्री असतानाही जिहे कठापूरची योजना पूर्ण करण्याची सदबुध्दी त्यांना सुचली नाही. याच योजनेच्या नावाने मते मागून निवडून आलेल्यांनी जनतेची फसवणूक केली. पण  गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार लोककल्याणकारी चारीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून  हा प्रश्न सोडविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. या योजानेला निधी मिळण्यासाठी हा प्रकल्प आनुशेषातून बाहेर काढणे गरजे होते.  त्यानंतर सुधारित मान्यता मिळवून देण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगटीवार,महसुल मंत्री चंद्रकांतदादा यांच्या विशेष प्रयत्नांमुळे 6 नोव्हेंबरला सुधारित शासकिय मान्यता मिळाली.
आता निधी मिळण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे आणि केंद्रित मंत्री नितीन गडाकरी यांच्यामुळे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत या रखडलेला प्रश्न मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आज जिहे कठापूर योजनेस 800 कोटी भरीव निधी मिळाला यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विनय सहस्त्रबुद्धे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे महेश शिंदे यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समिती सदस्या निलादेवी जाधव, सरपंच दिपाली मुळे, सुहास जोशी, विनोद इनामदार, भालचंद्र देशपांडे, उपसरपंच रणधिर जाधव, खटाव तालुका अध्यक्ष भरत मुळे, अभयराजे घाडगे, प्रकाश जाधव, अंकुशराव जाधव, हणमंतराव शिंदे, विनोद घाडगे, धिरज जाधव, यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
 (छाया : विशाल सूर्यवंशी)