एकात्मतेत मोठी शक्ती, जलयुक्तचे यश एकतेत : जिल्हाधिकारी सिंघल

????????????????????????????????????
एकता दिनानिमित्त बोलताना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल व व्यासपीठावर कैलास शिंदे, स्वाती देशमुख-पाटील, सुहास नाडगौड, राजेंद्र जाधव, सुहास पाटील, पुनिता गुरव, युवराज पाटील, धनंजय जाभळे.
कर्मवीर भाऊराव पाटील समाधी परिसरात एकता दौडची सुरूवात झेंडा दाखवून करताना जिल्हाधिकारी. 

सातारा:  एकता काय करु शकते, किती प्रचंड ताकद एकतेमध्ये असते याचे उत्तम उदाहरण सातारा जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानात अनेक गावांनी लोक सहभागातून नू भूतो ना भविष्यती अशी जलसंधारणाची कामे केली. अशीच एकता देश उभारणीसाठी गरजेची आहे, आज वल्लभाई पटेल आणि स्व. इंदिरा गांधींच्या स्मरण दिनाच्या निमित्ताने आपण एकता दौड करुन जिल्ह्याच्या विकासासाठी हा एकतेचा संकल्प करु, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले.
सरदार वल्लभाई पटेल यांच्या  जयंतीनिमित्त   जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, लाच लुचपतप्रतिबंध विभाग आणि क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर युनिटी अर्थात एकता दौड आयोजित करण्यात आली. सुरुवातीला येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीवर जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांच्यासह उपस्थितांनी फुले वाहून अभिवादन केले.  त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल व स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले. यानंतर यशवंत गायकवाड यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.  यावेळी मख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिदे, प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील, अँटी करप्शन ब्युराचे उप अधिक्षक सुहास नाडगौडा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राजेंद्र जाधव, क्रीडा अधिकारी सुहास पाटील,  शिक्षणाधिकारी (प्राथमिक)  पुनिता गुरव, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, नगरसेवक धनंजय जांबळे आदी   उपस्थित होते.
एकतेच्या जोरावर कोणतीही मोठी अडचणी आपण दूर करु शकतो. आज सातारा जिल्ह्यात एकतेच्या जोरावर दुष्काळी भागात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून चांगली कामे झाली आहेत. गावातील लोकांनी आपले मतभेद विसरुन एकजुटाने श्रमदानातून जलसंधारणाची चांगली कामे करुन आज ही दुष्काळी पट्टयातील गावे पाणी दार केली आहेत. हे शक्य झाले ते एकजुटीमुळे. नैसर्गिक आपत्तीलाही एकतेतुन मात करु शकतो हे यातून सिद्ध झाले आहे.  एकतेमध्ये मोठी ताकद आहे. एकतेच्या जोरावर स्वत:चा,  जिल्ह्याचा, राज्याचा व देशाचा विकास करावा. सरदार वल्लभाई पटेल यांना पोलादी पुरुष व स्व्. इंदिरा गांधी यांना पोलादी स्त्री म्हणून त्यांची आपण आठवण काढतो. भारत एक संघ ठेवण्यासाठी या दोघांची भूमिका महत्वाची आहे. त्यांच्या स्वप्नातील विकसीत भारत घडविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल   यांनी शेवटी केले.
यानंतर जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांनी हिरवा झेंडा दाखवून  या एकता दौडीचा प्रारंभ केला. सकाळी ठीक 730 वाजता निघालेली एकता दौड   पोवई नाक्यावरुन छत्रपती शाहू क्रीडा संकुलात आली.   विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ट्य अशा विविध घोषणा देत आणि घोष वाक्यांचे फलक घेऊन सर्व अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, विविध विद्यालयांचे विद्यार्थी, राष्ट्रीय  छात्र सेनेचे विद्यार्थी, पोलीस पथक यांचा दौडीत समावेश होता.