कोरोनाकाळात प्रशासनाचे आदेश व धार्मिक भावना जपत अंतविधी करणाऱ्या साजिद शेख यांच्या कर्तुत्वाला सलाम -: बाळासाहेब शिंदे

सातारा :- कोरोनाकाळात आई मुलाचे प्रेम आटताना ,भाऊ बहिणीचे नाते तुटताना, मैत्री संपुष्टात येताना संपूर्ण जगभराने पाहिले आहे .अश्या वेळेत स्वतःच्या जीवाची परवा न करता प्रशासनाच्या आदेशांचे पालन करत मृत व्यक्तिच्या कुटुंबाची धार्मिक भावना जपत अंतविधी पूर्ण करणाऱ्या व त्यासाठी कोणत्याही मदतीची अपेक्षा न बाळगता निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या गेंडामाळ कबरस्थानच्या प्रा चेअरमन साजिद शेख व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या कार्याला सलाम करतो व अश्या आदर्शवत कार्यातून नवीन देशप्रेमी तरुणाईची फळी उभारली जाईल अशी आशा बाळगतो अश्या शब्दांत सातारा शहर शिवसेना प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी गेंडामाळ कबरस्थान ट्रस्टच्या साजिद शेख यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देताना त्यांचा व त्याच्या ट्रस्टी व सहकाऱ्यांचा सन्मान केला .
स्वातंत्र्य संग्राम व देशाच्या स्वातत्र्यानंतर येणाऱ्या आताच्या व येणाऱ्या पिढीच्या स्मरणात राहणारा कालखंड म्हणजे हा कोरोना संक्रमण काळ आहे .कोरोना संक्रमण काळात कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी कित्येकांनी आपल्या जीवलगांना दूर केले . उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे कित्येकांना उपासमारीचा सामना करावा लागला परंतु अश्या भयावह परिस्थिती मध्ये काही समाजाभिमुख व्यक्तिमत्व स्वतःचे सर्वस्व पणाला लावून झटत होते. गोरगरिबांच्या उदरनिर्वाह बरोबरच, औषधे, दवाखाना, ऍडमिशन इत्यादी बाबींवर लक्ष ठेवून गुपचूप मदत करत होते काही जण प्रशासनाला मदत करित होते तर काही व्यक्तिमत्त्व धार्मिक पद्धतीने अंतविधी साठी प्रयत्नशील होते .कोरोनाकाळात दुसऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम करणारेच खरे कोरोना योद्धा आहेत आणि त्यांचा फुल नाही फुलांची पाकळी देऊन सन्मान करून त्याचे मनोबल व उत्साह वाढविणे हे आपले कर्तव्य आहे अश्या भावनेतून सातारा शहर शिवसेना प्रमुख व शिवप्रेरणा संस्थेचे वतीने कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला . एका ठिकाणी कार्यक्रम घेऊन समाजकार्य दाखवताना शासनाचे नियम तोडायचे नाहीत अशा स्पष्ट शब्दात बोलताना बाळासाहेब शिंदे यांनी घरोघरी जाऊन कोरोना योध्याचा सन्मान केला .
मुस्लिम समाजातील सातारा शहर व परिसरात कोरोनामुळे मृत झालेल्या 68 मृत व्यक्तीचे दफन सातारा शहर येथील गेंडामाळ कबरस्थान येते करण्यात आले त्यापैकी अंदाजे 50 जणांचे नमाज ए जनाजा गेंडामाळ कबरस्थान ट्रस्टचे साजिद शेख यांनी अदा करत गेंडामाळ ट्रस्ट च्या वतीने बहुतांशी ppe किट वगैरे देऊन नातेवाईकांचीही काळजी घेण्यात आली . तसेच खिदमत ए खलक ग्रुप ने ही ह्या समाजाभिमुख कार्यात सहभाग घेतला होता .ह्यामुळे शिवप्रेरणा संस्था व सातारा शहर शिवसेनेच्या वतीने गेंडामाळ कबरस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व खास करून साजिद अब्दूलगणी शेख यांचा सन्मान केला .
शिवप्रेरणा संस्था व सातारा शहर शिवसेना यांच्या वतीने कोरोना मुक्त होऊन कोरोनविरुद्ध प्रभागातील नागरिकांच्या हितासाठी झटणाऱ्या घोडके दाम्पत्य म्हणजेच चंद्रशेखर घोडके व नगरसेविका शेखर घोडके यांना सन्मानपत्र देऊन बाळासाहेब शिंदे यांनी सन्मान केला .
नगरसेवक वसंत लेवे यांचे कोरोना संक्रमण काळमध्ये प्रभागात प्रचंड मोठे कार्य केले आहे स्वतः जातीने हजर राहून रेशन किट ते दवाखाना सर्व अडचणीमध्ये वसंत लेवे यांनी हीरिरीने सहभाग घेतला होता त्यामुळे नगरसेवक वसंत लेवे यांचा ही सन्मान करण्यात आला .
शिवप्रेरणा संस्था व शिवसेना सातारा शहर यांच्या वतीने तब्बल 70 कोरोना योद्यांचा सन्मान करण्यात आला व त्यांच्या कार्याला प्रोत्साहित करण्यात आले .

गेंडामाळ कबरस्थान ट्रस्टचे साजिद शेख यांना कोरोनयोद्धा सन्मान पत्र देताना बाळासाहेब शिंदे व इतर