मानवाने ग्रंथालया बरोबर ग्रंथाशी मैत्री करावी -: जिल्हा माहिती आधिकारी युवराज पाटील ; जिल्हा स्तरीय उत्कृष्ठ “ग्रंथालय” कार्यकर्ता पुरस्काराने संजय इंगवले सन्मानीत.

पाटण,  : वाचाल तर वाचाल या न्यायाने मानवाने ग्रंथालयाशी मैत्री करावी. ग्रंथालयातील कार्यकर्त्यांनी साहित्य चळवळीशी निगडित रहावे. ग्रंथसंपदा वाढविणे व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी सातारा येथे प्रतापसिंह महाराज जयंतीनिमित्त अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय यांच्यावतीने श्रीमंत प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृतीप्रित्यर्थ जिल्हास्तरीय उत्कृष्ठ “ग्रंथालय” कार्यकर्ता पुरस्कार पाटण येथील श्रीमंत नागोजीराव पाटणकर वाचनालयाचे ग्रंथपाल संजय इंगवले यांना प्रधान करताना केले.

सातारा येथील पाठक हॉलमध्ये प्रतापसिंह महाराज जयंतीनिमित्त अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय यांच्यावतीने श्रीमंत प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृतीप्रित्यर्थ ग्रंथालय पुरस्कार वितरण युवराज पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंती ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अश्वमेधचे संस्थापक डॉ. रवींद्र भारती-झुटिंग हे उपस्थित होते.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे म्हणाले, अश्वमेधचा स्तुत्य असा उपक्रम आहे. ग्रंथालय कर्मचारी यांना कमी मानधनात काम करावे लागत आहे. खरोखरच संक्रमणाचा काळ असून  सुमारे पाच वर्षांमध्ये तर दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

याप्रसंगी आपल्या मनोगतात पाटण येथील श्रीमंत भीमराव नागोजीराव पाटणकर वाचनालयाचे ग्रंथपाल संजय इंगवले यांनी आपल्या मनोगतात सांगितले. श्रीमंत पाटणकर वाचनालयाचा या वर्षी अमृतमहोत्सव साजरा झाला आहे. मी वाटाड्याचे काम वाचकांपर्यंत प्रामाणिक केले आहे. असे सांगून मिळालेला पुरस्कार ग्रंथालय चळवळीशी निगडित असणाऱ्या कार्यकर्त्याना समर्पित करत असल्याचे नमूद त्यांनी यावेळी आवरज्रुन केले.

यावेळी प्रा. श्रीधर साळुंखे, नंदाताई जाधव, पार्टे यांनीही मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी उत्कृष्ठ ग्रंथालय पुरस्कार विद्यावर्धिनी सार्वजनिक ग्रामवाचनालाय (जकातवाडी ), उत्कृष्ठ ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार नंदाताई जाधव (सातारा), उत्कृष्ठ ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार संजय इंगवले (पाटण) व उत्कृष्ठ ग्रंथ वाचक पुरस्कार प्रा. श्रीधर साळुंखे (सातारा) यांना जिल्हा माहिती आधिकारी युवराज पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

दरम्यान श्रीमती कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन करुन कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास कोयना शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर, प्रा. बी. एन. पाटील, नागोजीराव पाटणकर वाचनालयाचे अध्यक्ष विलासराव क्षीरसागर, उपाध्यक्ष श्रीकांत फुटाणे, कार्यवाह चंद्रहार निकम, संचालक राजेश पवार, दत्तात्रय कवडे, मल्हारपेठ वाचनालयाचे ग्रंथपाल दादासाहेब पवार, त्रिपुडी येथील पाटणकर वाचनालयाचे संचालक अनिल वीर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.