संतोष विचारे यास तात्काळ अटक करावी ; पाटण मधील महिलांची मागणी

 

पाटण:- कोयना भागातील अल्पवयीन मुलीच्या असाह्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावरती अनैतिक रीत्या अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपी पोलिस पाटील पदावरती कार्यारत असणार्या संतोष दाजी विचारे याला तात्काळ अटक करावी. अशी मागणी पाटण मधील माहेर महिला आधार केंद्र व दक्षता समिती कडून पोलिस स्टेशनला निवेदनाद् वारे करण्यात आलेले आहे.

या निवेदनात असे म्हणले आहे कि, कोयना भागातील नाव गावातील अल्पवयीन मुलगी पाटण येथे आपले नातेवाईक संतोष विचारे याच्या घरी शालेय शिक्षणासाठी होती. तिच्या असाह्यतेचा गैरफायदा घेऊन संबधित संशयित आरोपी संतोष विचारे याने या अल्पवयीन मुलीवरती अनैतिक अत्याचार केले व या अत्याचारामुळे सदर मुलगी ही दबावाखाली येऊन तिची मानसिक स्थिती बिघडली आहे. तसेच या धराधमाच्या दबावामुले व दमदाटीमुले सदर पिडित मुलगी काहीही बोलण्यास तयार नाही. संबधित संशयित आरोपी विरोधात जास्तीजास्त पुरावे गोला करुन त्याला तात्काल अटक करावी व कडक शिक्षा होईल असा गुन्हा नोंद करावा.

तसेच सदर संशयित आरोपी संतोष विचारे हा पैश्याच्या व अधिकारांच्या वापर करून हे प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. यापुर्वी ही या नराधमाने असे अनेक प्रकार केलेले आहेत. अनेक मुली व महिलांकडे आपले करण्याचा याचा प्रयत्न असतो. हा पोलिस पाटील या पदावरती ही कार्यरत आहे. याला या पदावरुन तात्काल निलंबित करावे. अशी ही मागणी या निवेदनाद्वारे केलेली आहे.
सदर संशयित आरोपी राजकिय पदाधिकारी यांचेकडून शासकिय यंत्रणेवरती दबाव आणत असून या प्रकरणामध्ये जर या नराधमाने स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला तर आम्हा महिलांना आंदोलन करावे लागेल. अशी माहिती या निवेदना मधून देण्यात आलेली आहे. या निवेदनावरती माहेर महिला आधार केद्रांच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. आयेशा सय्यद (भाभी), सौ. विद्या नारकर/म्हासुर्णेकर, सुमन यादव, जयश्री लुगडे, ज्योती सुर्वे, नंदा पवार, शिलादेवी पाटणकर, शोभा कदम, शारदा मोहिते तसेच पाटण मधील महिला व युवती यांनी या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेश व्यक्त केला आहे.