आंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा

सातारा: छत्रपती शिवाजी विद्यापिठांतर्गत लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातर्फे सातारा येथे आयोजित आंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी नवीन इतिहास घडवत 16 पदकांची कमाई केली. स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या 6 खेळाडूंची मणिपूर येथे होणार्‍या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विभागीय स्पर्धेत प्रतीक भोसले, आशुतोष भारती, अभिषेक कदम, प्रतीक दळवी, मधूर भोसले आणि वैभव माळी या खेळाडूंनी त्यांच्या वजनगटात सुवर्णपदक पटकावले. या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तेजस यादव, सुनील जाधव, संग्राम लोरे, सयली पडवळ, प्राजक्ता यादव यांनी रौप्यपदक तर, आतिष तरडे, ओंकार पवार, अविनाश जाधव, प्रतिक्षा बर्गे आणि पूजा शिंदे या खेळाडूंनी कांस्य पदकांची कमाई केली. या सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सागर जगताप, गोपाल राठोड, विनोद दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य आर. व्ही. शेजवळ, फिजिकल डायरेक्टर डॉ. विकास जाधव, अकॅडमीचे अध्यक्ष हरिष शेट्टी, कार्याध्यक्ष दौलत भोसले, सचिव रविंद्र होले, असिस्टंट कमांडंट प्रशांत जगताप, सहायक पोलीस निरिक्षक भूषण आडके, अमर मोकाशी, विजय मोहिते, संजय पवार, डॉ. राहूल चव्हाण, सौ. सुजाता भोसले, समिर बागल, मयुर डिगे, असिफ मुलाणी यांच्यासह सर्व पदाधिकारी, सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, राजेंद्र हेंद्रे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.