उत्तराखंड राज्याचा सहकार समृध्द करण्यासाठी सातारा जिल्हा बँकेचे मार्गदर्शन घेणार : डॉ. रावत

????????????????????????????????????
सातारा : उत्तराखंड राज्य हे महाराष्ट्र व अन्य राज्यांच्या तुलनेत भौगोलीकृष्टया छोटे असले तरी उत्तराखंडचा सहकार समृध्द करण्याची आमची कल्पना सर्वार्थाने फलद्रुप करण्यासाठी देशात अग्रेसर असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाची माहिती घेणेसाठी भेट देत असलेचे  डॉ ़ धन सिंग रावत यांनी सांगितले ़ डॉ ़ रावत यांचेसोबत उत्तराखंड राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष दान सिंह रावत, उत्तराखंड विविध कार्यकारी सहकारी संस्था राज्य फेडरेशनचे अध्यक्षधनश्याम नैतियाल व सहकारी कार्यकर्ते मातबर सिंग रावत यांनी बँकेस भेट दिली ़
यावेळी मान्यवरांचे स्वागत बँकेचे उपाध्यक्ष ़सुनिल माने, संचालक  प्रकाश बडेकर, कांचन साळुंखे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ़ राजेंद्र सरकाळे यांनी केले ़
या भेटीवेळी बँकेचे उपाध्यक्ष ़सुनिल माने म्हणाले बँकेची स्थापना भारताचे माजी उपपंतप्रधान स्व यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेली आहे ़ साहेबांचा कृषी विकासाचा संकल्प व कृषी औद्योगिकरणाचा ध्यास बँकेने आपल्या प्रत्येक योजनेतून प्रभावीपणे कार्यान्वित केलेला आहे ़ शेतक-याला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी बँकेने अनेक महत्वपूर्ण योजना यशस्वीपणे राबविलेल्या आहेत ़ बँकेस स्थापनेपासून अ ऑडीट वर्ग मिळाला आहे ़ बँक तळमळीने व निष्ठेने ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचली असून विविध प्रकारे बँक सामाजिक बांधिलकी जपत असलेचे नमूद केले ़ बँकेस प्राप्त झालेले उत्कृष्ठ कार्यक्षमतेबद्दल देश पातळीवरील नाबार्डचे तसेच इतर संस्थांचे पुरस्कार, बँकेस मिळालेले आयएसओ 9001-2008 मानांकन इत्यादिंबाबत सविस्तर माहिती दिली़
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ़ राजेंद्र सरकाळे म्हणाले, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती व बँकेचे संचालक ना़  रामराजे नाईक निंबाळकरसाहेब यांचे नेतृत्व तसेच अध्यक्ष  आ़ शिवेंद्रसिंहराजे भोसले व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन यामुळे सातारा जिल्हा बँकेचे कामकाज उल्लेखनिय आहे़  सातारा जिल्हा बँकेचा नावलौकिक संपूर्ण देशात आहे ़ बँक प्रतिवर्षी शेतकरी सभासद, सहकारी संस्था यांचेसाठी नफ्यामधून भरीव तरतूद करीत असते़   3 लाख रूपयांपर्यंत शेतक-यांना पीक कर्ज शून्य टक्के दराने देते . या जिल्हयात दुष्काळी भाग, अतिपाऊस, कमी पाउस असे तीन भाग असून त्याप्रमाणे बँकेने विविध कर्ज योजनांचे माध्यमातून शेतकरी सभासदांना कर्ज पुरवठा करीत आहे . संस्थांंना प्रतिवर्षी नफ्यातून शेअर्स रुपात भरीव रक्कम देते त्यामुळे सभासद संस्थांचे आर्थिक विकासाला चालना मिळत आहे ़ बँकेची 6 दशकांहून अधिक काळ आदर्शवत व उज्वल परंपरा, बँकेच्या ठेवी, कर्जे यामधील लक्षणीय वाढ, उत्कृष्ठ निधी नियोजन, भावी काळातील अनेकविध नविन विकास योजना, सीबीएस कार्यप्रणालीव्दारे ग्राहकांना जलद सेवा इत्यादि अनुषंगाने सविस्तर माहिती विषद केली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ ़ धन सिंग रावत म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकार क्षेत्रातील आदर्शवत बँक आहे ़ उत्तराखंड राज्यातील सहकार सशक्त करण्यासाठी सातारा जिल्हा बँकेचे कामकाज मार्गदर्शक ठरेल याची खात्री झाली आहे ़ सातारा जिल्हा बँक राष्ट्रीय स्तरावर अग्रेसर का आहे याचा आम्ही पूर्ण अभ्यास करूनच येथे आलो असलेचे नमूद करून बँकेने शेती, सहकार यामध्ये चांगले कामकाज केलेले आहे ़  आम्ही गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सहकारी बँकांना भेटी दिलेल्या आहेत ़ यामध्ये या बँकेचे कामकाज उत्कृष्ठ असल्याचे दिसून आले ़ बँकेच्या कामकाजामध्ये पारदर्शकता, विश्‍वासाहर्ता असलेने ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे ़ ही बँक स्पर्धेत कोठेही मागे नसलेचे दिसून येत आहे.
यावेळी बँकेचे संचालक मंडळ व अधिकारी यांना देहरादून, उत्तराखंड येथे येवून सहकार क्षेत्रास मार्गदर्शन करणेचे आवाहन केले ़ या भेटीप्रसंगी बँकेचे सरव्यवस्थापक  एस ़एन ज़ाधव,  आर ़एस ़ गाढवे,  सुजित शेख, सर्व विभागांचे उपव्यवस्थापक, विभाग प्रमुख, सेवक उपस्थित होते.़