डीसीसी बँकेस महाराष्ट्र स्टेट को-ऑप.बँक असो.चा उत्कृष्ठ बँक पुरस्कार जाहीर 


साताराः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन, मुंबई यांचेवतीने दिला जाणारा उत्कृष्ठ बँक पुरस्कार सन 2017  या वर्षाकरिता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सन 2016-2017 च्या आर्थिक परिस्थितीच्या आधारावर जाहीर झाला आहे ़ यापुर्वी सलग 3 वर्षे या पुरस्काराने सन्मानित करणेत आले असलेने चालू वर्षी सन्मानपूर्वक प्रशस्तीपत्रक देवून बँकेचा विशेष गौरव करणार असलेचे महाराष्ट्र स्टेट को-ऑप ़बँक्स असोसिएशन यांनी कळविले आहे . बँकेचे गुणवत्तापूर्वक कामकाजामुळे सन 1997-1998 पासून बँकेस 16 वेळा संपुर्ण राज्यातून उत्कृष्ठ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्काराने सन्मानीत केले आहे ़ जिल्हयातील सर्वसामान्यांचे आर्थिक उन्नतीसाठी राबवित असलेल्या विविध प्रभावी कर्ज योजना, कर्ज वसुलीबाबत सतर्कता, प्रभावी वसुली यंत्रणा, ठेवी व कर्जे यामधील लक्षणीय वाढ, उत्कृष्ठ निधी नियोजन, निव्वळ एन ़पी ़ए ़ शून्य टक्के, बँकेचे दर्जात्मक कामकाज, गुणवत्ता व ग्राहकाभिमुख सेवा यामुळे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये सहकार क्षेत्रातील सर्वोच्च बँक म्हणून नोंद, आयएसओ 9001-2008 मिळालेले मानांकन तसेच सामाजिक बांधिलकी कायमच जपत असलेने बँकेेने सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमठविलेला आहे ़ बँकिंग व्यवहारासाठी ग्राहकांना कॅशलेस सुविधा पुरविणेबाबत आर्थिक साक्षरता केंद्राव्दारे ग्राहकांना मार्गदर्शन उपलब्ध केले आहे ़  या पुरस्काराबद्दल बँकेचे अध्यक्ष ़आ.़श्री.छ ़ शिवेंद्रसिंहराजे भोसले, संचालक व विधान परिषद सभापती ना. ़श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष सुनिल माने, लक्ष्मणराव पाटील (माजी खासदार), आ. शशिकांत शिंदे, ़आ.बाळासाहेब पाटील, विलासराव पाटील (उंडाळकर),़विक्रमसिंह पाटणकर,़प्रभाकर घार्गे (माजी आमदार),़दादाराजे खर्डेकर यांचेसह सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ़ राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक एस ़ एन ज़ाधव, एम ़ व्ही ज़ाधव, सर्व विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सेवक वर्ग, बँकेचे सभासद, ग्राहक, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांनी बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या ़