सातारा जिल्ह्यात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

सातारा : रामनामाचे महत्व सार्‍या जगाला पटवून देणार्‍या सातारा जिल्ह्यातील माणगंगे तीरी असणार्‍या श्री क्षेत्र गोंदावले येथे आज गुरुपौर्णिमेनिमित्त भावीकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
पहाटे पासूनच या ठिकाणी श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदावलेकर यांचे समाधीचे दर्शनासाठी व अनुग्रह घेण्यासाठॅी लांबच लंाबं रांगा लागल्या होत्या. सकाळी लवकरच दर्शनार्थीसाठी महाप्रसादाची सोय येथे संस्थानचे वतीने करण्यात आली होती.
गुरु पौर्णिमेनिमित्त राज्यातूनच नव्हे तर संपुर्णं देशातुन या ठिकाणी भावीकांनी गर्दी केली होती. दर्शनाथीर्र्च्या अतीव उत्साहामुळे सातारा ते पंढरपूर हा रस्ता वाहनांकरीता काही काळ बंद ठेवण्यात आला होता.
जिल्हयातील सज्जनगडावरही समर्थं रामदास स्वामीचे भक्तगणांनी तसेच रामदास स्वामींचे शिष्य प. पु. श्रीधरस्वामी यांचे श्रीधर कुटीत गुरु पौर्णिमे निमित्त विशेष पाद्य पुजा करण्यात आली तसेच भावीकांनी येथे दिवस भर दर्शनासाठी तसेच महाप्रसाद घैण्यासाठी गर्दी केली होती.
सातारा जिल्हयातील श्री क्षेत्र पुसेगाव येथील सेवागिरी महाराज, मायणी येथील स्व.सरुताईचे आश्रमात, वावरहिरे येथील श्री हनुमंत महाराज तसेच श्री क्षेत्र नारायणपुर, श्री क्षेत्र मेार्वे ता. खंडाळ येथे ही दत्त भक्तांनी गर्दी केली होती.
सातारा शहरातील श्री स्वामी समर्थं महाराज मठात, शा़हूपुरीतील गजानन महाराज मंदिर येथे भावीकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गुरु पौर्णिमेनिम्मित सातारा शहरातील मुतालिक दत्त मंदीर तसेच आनंदवाडी दत्त
मंदीरात फुलांची विशेष सजावट करण्यात आली होती.