जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे विविध मागण्यांचे निवेदन

फलटण: सातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना फलटणच्यावतीने फलटणचे नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे यांना शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सर्वांना जुनी पेन्शन योजना सुरु करा, मुल्यांकनपात्र कनिष्ठ महाविद्यालयांची नावे जाहिर करुन अनुदान द्या, माहिती तंत्रज्ञान विषय अनिवार्य करा, 24 वर्षे सेवाधारकांना विना अट निवडश्रेणी द्यावी, शिक्षकांच्या वाढीव पदांना मान्यता देवून नियुक्ती मान्यता देणे, सेवा निवृत्तीचे वय 60 करा, कनिष्ठ महाविद्यालयीन प्रशासन वेगळे करा, शिक्षकांच्या पाल्यांना मोफत शिक्षक, तासिका तत्वावरील शिक्षकांचे मानधन वाढवा, शिष्यवृत्ती प्रक्रिया सुलभ करा, वरिष्ठ व निवडश्रेणीचा 21 डिसेंबर 2018 चा शासन आदेश रद्द करा, वैद्यकीय खर्च पुर्तीसाठी कशलेस सेवा मिळावी या व अशा मागण्यांचे निवेदन यावेळी देणेत आले.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे विभागीय प्रतिनिधी प्रा. आर. एस. शिंदे, जिल्हासहसचिव प्रा. गोविंद वाघ, जिल्हा महिला प्रतिनिधी प्रा. सौ. निलम देशमुख तालुकाध्यक्ष प्रा. सतीश जंगम व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उपस्थित होते.