पर्यावणाच्या रक्षणासाठी मानवाची जीवनशैली बदलण्यासाठी निधी उभारू: डॉ.कैलास शिंदे

सातारा (शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुखे जि.प.मैदान,सातारा) : पर्यावरणाचा र्‍हास थांबविण्यासाठी शाळा व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून ओढे-नाले अथवा नद्यांची शुद्धता केली जाईल. चांगले काम करणार्‍यास बक्षिसेही दिले जातील.बक्षिसापेक्षा जीवनबदल महत्वपूर्ण आहे.तेव्हा मोठ्या प्रमाणावर निधी उभारला जाईल.असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी दिले.
येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर,शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे नागरी,यशवंतराव चव्हाण व्यासपीठावर 20 वा सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव मोठ्या दिमाखात सुरू झाला असून,ढासळलेले पर्यावरण व युवकापुढील आव्हानेया विषयावर झालेल्या सत्रात डॉ.शिंदे मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर होते.
डॉ.कैलास शिंदे म्हणाले,लहान वयामध्येच खर्‍या अर्थाने टिकावूस्वरूपाचे संस्कार होतात.तेव्हा मोठ्या लोकांनी केलेल्या चुकामुळेच पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे.म्हणून आजच्या अध्ययनार्थीनी / युवकांनी सकारात्मकदृष्ट्या स्वच्छता राखली पाहिजे. ओढे-नाले अथवा नदीची स्वच्छता करण्यासाठी पुढे आले पाहिजे.त्यासाठी शाळेतील मुले-मुली व ग्रामपंचाईतीचे ग्रामसेवक यांच्या माध्यमातून कार्यक्रमाची आखणी केली जाईल. पाण्याचा रंग मानवाने बदलला,वेताची काठी याबाबत खुमासदार कथा सांगून लहान वयातच चांगल्या सवयी लावून भविष्यकाळ उज्वल करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
जि. प.अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर म्हणाले,स्वच्छता मोहीम संदर्भात पर्यावरण जागृतता निर्माण होत आहे. देशात प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्वच्छतेबाबत मिळाले आहे. यापुढे घनकचरा या विषयी दुसर्‍या टप्प्याचे काम जिल्हा परिषद करणार आहे.
यावेळी अभिजीत घोरपडे, अदिती देवधर, डॉ.राजेंद्र शेंडे, संदीप श्रोत्री आदींनी पर्यावरण रक्षणाबाबत प्रबोधन केले. पाटणचे गटशिक्षणाधिकारी आर.पी.निकम यांनी प्रास्ताविक केले. सुनीता कदम यांनी सूत्रसंचालन केले.प्रदीप कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले.