जगत्विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ.प्रो.मिरोस्लोव्ह फेरीन्क यांची सातारा भेट यशस्वी

सातारा : भारतातील सातारा शहरासारख्या छोट्या शहरातही आंतरराष्ट्रीय दर्जाला लाजवेल अशी दिली जाणारी आरोग्य सेवा ही विशेष स्पृहणीय गोष्ट आहे व याचे मला कौतुक वाटते असे गौरवोद्गार  युरोपियन कार्डीओलॉजी सोसायटीचे जगत्विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ.प्रोफेसर मिरोस्लोव्ह फेरीन्क यांनी काढलेे.
डॉ.प्रोफेसर मिरोस्लोव्ह फेरीन्क यांनी येथील सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये भेट दिली.त्यांचे समावेत यावेळी डॉ.मधुसुदन आसावा,डॉ. रोहित दिक्षित हे सातारा हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ उपस्थित होते.सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये डॉ.फेरीन्क यांनी हृदयरोग उपचारातील अत्यंत गुंतागुतींच्या समजला जाणारा प्रकार म्हणजे सीटीओ (कॅल्सीफाइड टॉरचर्स आँक्लूझिव लिजन) सर्वसामान्य सरळसोट असणार्‍या रक्तवहिन्यांमध्ये झालेले ब्लॉकेजेस च्या अतिशय अवघड पण हेच ब्लॉकेजेस जेव्हा वाकड्या तिकड्या वळणदार रक्तवाहिन्यांच्या शाखांमध्ये निर्माण होवून त्यामध्ये कॅल्शिअमचे थर साठल्यामुळे दगडासारखे कठीण होतात तेव्हा ते हाताळण्यासाठी प्रदीर्घ अनुभव, विशिष्ट तंत्रज्ञान आणि पराकोटीचे कौशल्य आवश्यक असते याची चूणूक दाखवत अश्या 4 अ‍ॅन्जीओप्लास्टी  यशस्वीरित्या पूर्ण केल्या. डॉ. फेरीन्क हे अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यामध्ये निष्णात असून अनेक रुग्ण संपूर्ण जगात त्यांनी बरे केलेले आहेत.
या गुंतागुंतीच्या 4 हृदयशस्त्रक्रिया पुर्ण केल्यावर  निमंत्रित तज्ज्ञ डॉक्टरांना मार्गदर्शन करताना डॉ. फेरीन्क  यांनी सातारा डायग्नोस्टिक सेंटरच्या सर्व सुविधा आणि सुसज्ज अश्या विनम्र आणि तितक्याच आदरतीथ्यशील अश्या सर्व टीमचे कौतूक केले. आज केलेल्या सर्व शस्त्रक्रिया या अतीशय कठीण आणि क्लिष्ट असल्या तरी माझे कडून या यशस्वी पणे मीपूर्ण करु शकलो आणि या रुग्णांचे तसेच त्यांचे नातलगांचे कडून मला यासाठी निश्‍चितच शुभेच्छा मिळतील आणि मला पुन्हा या ठिकाणी यायला आवडेल असे सांगितले .
 सातारा डायग्नोस्टिक सेंटरच्यावतीने डॉ. फेरीन्क यांचा सन्मानपत्र देउन तसेच पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देउन डॉ.सुरेश शिंदे यांनी तसेच सातारकर नागरीकांचे वतीने जयेंद्र चव्हाण, शैलेंद्र पळणिटकर, डॉ. श्रीकांत बोकील आणि डॉ.उदय चिडगूपकर यांनी सत्कार केला.
 यावेळी बोलताना सातारा डायग्नोस्टिक सेंटरचे प्रमुख डॉ. सुरेश शिंदे म्हणाले की, डॉ.प्रोफेसर मिरोस्लोव्ह फेरीन्क  यांच्या आजच्या या अतिशयमहत्वपूर्ण आणि अवघड  अश्या  शस्त्रक्रियांच्या यशस्वीतेमुळे सातारच्या आरोग्यसेवेत मानाचा तुराच खोवला गेला आहे.सातारा ही शिवरायांची राजधानी असून त्यात सातारा डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून दिली जाणारी ही रुग्ण सेवा आज आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली असे सांगताना मोठा आनंद होत आहे. अतिशय हुशार आणि कसबी  आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या गुणवंत डॉक्टरांमुळे अनेक रुग्णांना जीवदानच मिळत आहे. तसेच परिसरातील डॉक्टरांसाठी ही एक पर्वणी ठरली आहे.मी डॉ.फेरीन्क यांना येथे पुन्हा पुन्हा येत सेवा देण्याची विनंती करतो आहे.
 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.उमेश पिंगळे यांनी करताना सातारा डायग्नोस्टिक सेंटरच्या विविध आरेाग्य सेवा आणि उपक्रमांची माहिती देताना या ठिकाणी सुरु असलेल्या कॅथ लॅबमधील ऑपरेशन प्रोसिजरचे थेट प्रक्षेपणाची सुविधा आज सुरु करण्यात आली, याचा उपयोग भविष्यात विविध डॉक्टरांना प्रशिक्षणासाठी होणार आहे.अश्या प्रकारचे नवनवीन उपक्रमांद्वारे रुग्ण सेवा समृध्द करण्याचा सातत्याने येथे प्रयत्न चालू आहे. लवकरच रुग्णसेवेचा व प्रशिक्षण देणारे सर्वोत्तम केंद्र म्हणून नावलौकीक मिळवेल असे सांगितले. आभार प्रदर्शन डॉ. रविंद्र धोंगडे यांनी केले.   या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण,दैनिक ऐक्यचे संपादक शैलेंद्र पळणिटकर,ज्येष्ठ धन्वंतरी डॉ.अनंत साठे, डॉ.पी.पी.जोशी, ह्दयरोग तज्ञ डॉ.सोमनाथ साबळे,डॉ.सुहास जोशी, डॉ.श्रीकांत बोकील, डॉ.उदयराज फडतरे,डॉ.भास्कर यादव, डॉ.सौ.जयश्री शिंदे, डॉ.शलाका शिंदे, डॉ.विकास जाधव,अभिजीत वाघ, नवीन अफझलपूरकर,श्रीकांत देशमुख, डॉ.सदानंद कोल्हटकर, विक्रीकर उपआयुक्त तानाजी सपकाळ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.