सातारा पालिकेत बंद केबिनमध्ये राम हादगे याची पत्रकाराला शिवीगाळ ,जीवे मारण्याची धमकी ; शहर पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल

सातारा :- ( प्रतिनिधी ) सातारा पालिकेच्या पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांचे पती राम हादगे यांनी सातारा नामा न्यूज पोर्टल चे संपादक संदीप शिंदे यांना पालिकेत मंगळवारी विरोधात बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून शिविगाळ केली .उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी मध्यस्थी केल्याने फार तणाव वाढला नाही .

सातारानामाचे संपादक व पत्रकार संदीप शिंदे यांनी आपल्या विरोधात बातमी लिहून काही व्हिडिओ शूटिंग केल्याची माहिती पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांचे पती राम हादगे यांना समजली . हादगे यांनी पत्रकार शिंदे यांना उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या केबिनमध्ये बोलावले . शेंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत तू माझे व्हिडिओ शूटिंग का केले ? असा जाब हादगे यांनी विचारात शिंदे यांना शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि पत्रकारांना अजिबात जुमानत नाही अशी उध्द ट भाषा वापरली . शिंदे व हादगे यांच्या वादावादीचे पर्यावसान हाणामारीतच होणार होते मात्र उपनगराध्यक्षांनी मध्यस्थी केल्याने फार तणाव वाढला नाही . मात्र पालिकेतील महिला सभापतींच्या पतींचे उद्योग या निमित्ताने पुन्हा चर्चेत आले आहेत . सातारा शहर पत्रकार संघाच्या वतीने या प्रकरणाचा निषेध करण्यात आला आहे . शिंदे यांनी तक्रार दिल्याने सातारा शहर पोलिसांनी राम हादगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे . पत्रकारांचे शिष्टमंडळ लवकरच जिल्हा पोलीस प्रमुखांना याप्रकारे निवेदन देणार आहे