समाजातील अंधश्रध्दा दूर करण्यासाठी विज्ञानाचा दिप जागता ठेवा : समीर शेख

बक्षीस वितरणाने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप संपन्न
सातारा ः आज समाजात अनेक रुढी, वाईट चालीरिती यांचा प्रकार वाढत असताना अंधश्रध्देसारख्या वाईट प्रथांना कायम स्वरुपी घालवण्यासाठी विज्ञानाची मदत घेत हा विज्ञान रुपी दिवा सतत जागृत ठेवा, देशात अनेक महान संशोधक निर्माण झाले त्यांच्या कार्याचे स्मरण करा व त्यांची प्रेरणा घेऊन तुम्हीही नव्या पिढीचे संशोधक बना असे उद्गार सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेख यांनी काढले.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, राज्यविज्ञान शिक्षण संस्था नागपूर, सातारा जि.प. शिक्षण विभाग व येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमानें सातारा येथील न्यु इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. सी. व्ही. रमण शास्त्रनगरीत आयोजित केलेल्या 44 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे सांगता समारंभात समीर शेख प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सातारा जि.प.चे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे हे होते तर शिक्षण सभापती राजेश पवार, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेच्या नियामक मंडळाचे सदस्य अनंत जोशी, जि.प सदस्य शिवाजीराव चव्हाण, अर्चना देशमुख, माजी सदस्य मच्छिंद्र क्षीरसागर, पं.सं चे उपसभापती जितेंद्र सावंत, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण,सयाजीराव पाटील,अण्णासाहेब मगदूम, शाला प्रमुख स्नेहल कुलकर्णी आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख होती.
यावेळी आपल्या प्रास्ताविकात शिक्षणविस्तार अधिकारी मंगल मोरे यांनी जिल्हयातील अकरा तालुक्यातील 66 मुले व मुली व शिक्षक व परिचर यांनी या प्रदर्शनात 121 उपकरणे सादर केली न्यु इंग्लिश स्कूलच्या 16 वर्गात मांडलेले हे भव्य प्रदर्शन हजारोंनी अनुभवले या प्रदर्शनातून नव्या संकल्पना निर्माण हेाउन नवे शोध लागतील अस विश्‍वास व्यक्त केला.
कायर्ंक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते तुळशीचे रोपास पाणी घालून करण्यात आली, न्यूइंग्लिश स्कुलच्या चमूने स्वागत गीत म़्हटले तर पर्यावरण गीत संदीप त्र्यंबके या शिक्षकाने सादर केले. तसेच सर्व मान्यवरांचे स्वागत वाचनीय पुस्तक देउन करण्रात आले. यावेळी शिक्षण सभापती राजेश पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शास्त्रीय भुमीकेवर हा विज्ञनानाला चालना देणारा उपक्रम हाती घेत आता या प्रदर्शनासाठी निधि वाढवून दिला जाईल असे संािंगतले.
अनंत जोशी यांनी लहान वयात आपल्या देशातील पिढीला संधी मिळत असताना अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्यासाठी आपल्या अभ्यासाचा उपयोग करा असे आवाहन केले..
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणार्‍या जि.प उपाध्यक्ष वसंराव मानकुमरे यांनी देशात मोठी ताकद तुमच्या पिढीकडून नवीन शोध लावत निर्माण होईल आज मोटी स्वप्ने पहात अधिक मोठे व्हा, आज भेडसावणार्‍या अनेक समस्यांसाठी अभ्यास करत पुढे या नवनवीन शोध लावा व त्यातू नविज्ञानाची महती जगाला पटवून द्या असे सांगतिले.
या प्रदर्शनात बक्षीस पात्र ठरलेले प्रयोग व त्याचे निर्माणकर्ते .. प्राथामिक गटात मोळ येथील चंदना संताजी देशमुख, बिचुकले कोरेगाव येथील संध्या विठ्ठल अडागळे, व गोंदावले बुद्रुक येथील अनिरुध्द श्रीकष्ृण काटे, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात नायगाव विद्यालयाची विनया दशरथ थोपटे, सातारारोड येथील प्रगती धनंजय भगत व आसरे येथील गणेश संजय चव्हाण, शिक्षक गटात डोळेगाव येथील राजेश उत्तमराव पवार, शिरवळ येथील एम. वाय पठाण,कारंडवस्ती येथील गणेश भगवान तांबे, अंबवडे येंथील संदिप शंकर त्रिंबके, पाटखळ येथील सुनील संपतराव दळवी आदींना यावेळी मान्यवरांचे हस्ते सन्माचिन्ह देउन गौरवण्यात आले.
समारंभाचे सुत्र ंसंचालन सौ.विनया कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन उपशालाप्रमुख डी. एस. कांबळे यांनी केले. समारंभास जिल्ह्यातील विविध शाळांचे प्रतिनिधी, शिक्षक शिक्षिका,पालक,व शालेय मुले व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.