राजेशाही पद्धतीने सातारा स्वाभिमान दिन उत्साहात

राजसदर हे नतमस्तक होण्याचे ठिकाण : प्रा. के. एन. देसाई
सातारा : 18 वर्ष छत्रपती शाहु महाराज कैदेत होते. कैदेतून सुटल्यानंतर त्यांच्यासोबत केवळ 12 माणसं होती. ती निरुपयोगी होती. बुद्धीमान होते. शाहु महाराजांनी महाराष्ट्रात 1 हजार सरदार पुन्हा उभे केले. ज्यांना बुद्धीचे तडाखे दिले ते उबदारी आले नाहीत. त्यांचा राज्यभिषेक 12 जानेवारी 1708 ला किल्ले अजिंक्यतारा येथे झाला. अटकेपार झेंडे मराठयांनी रोवले ते किल्ले अजिंक्यताऱयावरुन दिलेल्या आदेशाने. पेशव्यांनी आपली वस्त्री अजिंक्यताऱयावरुन नेलीत. शाहु महाराजांची दुरदृरदृष्टी मोठी होती. त्यांनी जाणत्यांच्या हातात सुत्रे दिली. राज्यकारभार स्वतः करत होते. साताऱयाच्या गादीचे कर्तत्व मोठे आहे. किल्ले अजिंक्यताऱयाची राजसदर हे पिकनिकचे ठिकाण नाही तर नतमस्तक होण्याचे ठिकाण आहे, असे मत इतिहासकार प्रा. के.एन.देसाई यांनी व्यक्त केले.
सातारा स्वाभिमान दिन सोहळयास प्रा. के. एन. देसाई, अजय जाधवराव, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, पंचायत समितीचे सदस्य आशुतोष चव्हाण, नगरसेवक धनंजय जांभळे, शेखर मोरे – पाटील, विजय काळोखे, हेमंत गुजर, उद्योजक कन्हैय्यालाल राजपुरोहित, बी.एन.केवटे, युवराज पवार, धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलावडे, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे संस्थापक सुदामदादा गायकवाड, शरद पवार, मार्गदर्शक दीपक प्रभावळकर, मनसेचे सातारा शहर प्रमुख राहुल पवार, गोडोलीतील सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे धारकरी अभिजीत बारटक्के यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रा.के.एन.देसाई म्हणाले, शाहू महाराजांची कारकीर्द कशी झाली?, सर्व संपले असताना अटकेपार झेंडे रोवले हे माहिती पडले पाहिजे. इतिहासाचा आंधळा अभिमान शाप आहे. घोर अज्ञान हा एक गुन्हा आहे. त्याकरता वाचन केल्याने तो गुन्हा दुर होतो. गेल्या 150 वर्षात पर्यंत केले नाहीत, अशी कोटयवधी कागदपत्रे वाचनाविना पडून आहेत. जो समाज भूतकाळ विसरतो त्यास भविष्य उजवल नसते. होणारी अधोगती टाळता येत नाही, असे सांगत ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांची ही ससे होलपट झाली आहे. त्यांचे औरंगजेबाने हाल करुन मारल्यानंतर झुल्फीकार खानाने रायगडाला वेढा दिला होता. त्याचवेळी येसूबाईंनी राजाराम महाराजांना जिंजीला पाठवलं. रायगड खानाने घेतला.साडे सहा वर्षे किल्ला मराठयांनी लढवला होता. मराठे रसद मध्येच हाणत होते. 3 नोव्हेंबरला मराठयांच्या ताब्यातून रायगड गेला. शाहु महाराज 18 वर्षे कैदेत होते. 1707 ला औरंगजेब मरण पावला. तेव्हा आझमशाह औरंगजेबाजवळ होता. शाहू महाराजांचे हात अडकले होते. ते अगोदर बाहेर काढण्याकरता त्यांनी प्रयत्न सुरु केले. आपलं वागणं निरुपद्रवी आहे याची जाणीव करून त्यांनी सहानभूती मिळवली होती. झुल्पीकारखानाला पश्चाताप झाला होता. संभाजी महाराजांना पकडून आणलं खरं पण त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या बायकापोरांची काय चुकी होती. यामुळे त्यांच मन खात होतं. तो मनानं शाहु महाराजांच्या सोबत होता. शाहु महाराजांची सुटका करावी अशी मागणी करत होता. औरंगजेबाची मुलगी झिन्नत उनीसा ही अविवाहित राहिली. तीनंही माय लेकरांची काळजी काळजी घेतली. शाहु महाराजांनी शत्रूच्या गोटात सहानभूती मिळवली होती. 13 मार्च 1607 ला पुन्हा वाटाघाटी झाल्या. 6 मे 1607 ला भोपाळ नजिक करार झाला. दक्षिणची सत्ता सांभाळायची. त्याबदल्यात आई येसुबाईंना आणि इतरांना ओलीस ठेवायचे. असा करार झाला. उद्धव जगदेव यांना सोबत पाठवले. तर शाहू यांच्या बरोबर बडवणी यांच्यासह केवळ 12 जण होते. ते सैनिक नव्हते. शाहु महाराजांना मोहनसिंग रावळ यांनी मदत केली. उत्तरेत अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अभिमान आहे. ज्यांना शिवाजी महाराज माहिती नाहीत, त्यांना राहण्याचा अधिकार नाही, असे निष्ठेने सांगतात. शाहू महाराज अमृतराव कदम – बांडे भेटले ते तापी नदीच्या कोकरमंड येथे. त्यांनी मदत केली. शाहु महाराजांनी महाराष्ट्र आपले सरदार नव्याने जमवले. सुजनसिंह रावळ, बापूजी सोमनाथ दिघे यांनी पत्रव्यवहार केला. परोळ्याचे जहागीरी दिली. केवळ ढाल तलवारीने नाही तर चांगलेपणाने वैभव उभे केले. निंबाळकर बागळणामध्ये मिळाले. महादजी निलकंठराव हेही सोबत होते. अहमदनगरला थांबून त्या ठिकाणाहून हालचाली केल्या. 10 ऑक्टोबरला पुणे प्रांतात पाउल ठेवले. चांभळी गाव पुरंदरच्या शेजारी आहे. त्या गावात अखंड तंडबंदी आहे. गाव कूस बघायला मिळते. दगडांची आहे. ज्योत्याजी केसकर यांनी तीन महिन्यांनी दिल्लीतून सनदा घेऊन परत आले. ते छत्रपती संभाजीराजे यांचे अंगरक्षक होते. शाहू महाराजांनी शून्यातून हजारो घर पुन्हा तयार केली. निष्ठा बघून पदे दिली. दौलताबाद जवळ पारध नावच गाव आहे. तेथील शहाजी लोखंडे यांना गडावरुन खाली बोलवले. परंतु त्यांनी चर्चेला न येताच जीवन संपवले. त्यांची पत्नी मुलाला घेऊन पुढे आली. मुलाला पालखीत ठेवले. शाहू महाराजांनी मुलाचं नाव फत्तेसिंह ठेवले अन् आपले आडनाव दिले. अक्कलकोटचं घराण ते आहे. वैरासाठी वैर नसावं म्हणून ताराराणीशी वाटाघाटी झाल्या. परंतु ताराराणींनी महत्वकांक्षा असलेल्या मानायला तयार नव्हत्या. सातारा सोडायला तयार नव्हत्या. शाहूं महाराजाचा समाज हाच पक्ष. शाहू राजांची तडफ होती.ताराराणींच्या फौज त्यांच्यावर गेल्या. 12 ऑक्टोबरला खेडला लढाई झाली. शाहु महाराजांनी विजय मिळवल्यानंतर वाल्हे मार्गे शिरवळ येथे आले.चंदन – वदन करत ताराराणींना सातारा हवाली करण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी लढून घ्या, असे सांगून कोल्हापूरकडे प्रयाण केले. गडप्रतिनिधी शेख मीरा हा होता. तो एकेरीतच, येत होता. त्यास शाहु महाराजांनी वाईत बायका पोरं आहेत, याची जाणीव करुन देताच त्याने किल्ला ताब्यात दिला. शाहू महाराजांनी बुद्धीचे तडाखे दिले. ती माणसं उबदारी आली नाहीत. पेशव्यांनी किल्ले अजिंक्यताऱयावरुन वस्त्री नेलीत. शाहु महाराजांचा राज्यभिषेक 12 जानेवारी 1708 ला झाला. त्यांनी वतन दिली. 1713 साली पेशवे पद दिले. पेशव्यांना कर्ज कोण देत नव्हते. सावकारांकडे राव रंभा निंबाळकर गेले तेव्हा कर्ज दिल. त्यांनी तेथे तारण म्हणून मिशी दिली. जाणत्याच्या हातात सूत्रे दिली. सातारचे गादीचे कर्तृत्व मोठे आहे. पिकनिकच ठिकांण नाही तर नतमस्तक होण्याची ठिकाण आहे, असे त्यांनी सांगितले.
भोसले कुळाचा इतिहास मातृभक्तीचा
अजय जाधवराव म्हणाले, इतिहासात एकमेव किल्ला असा आहे किल्ले अजिंक्यतारा हा जेथे भोसले घराण्यातील सर्वांचे पाऊले लागली आहेत.1636 ला शहाजीराजे या किल्लावर आले होते. शिवाजी महाराज आजारपणाच्या काळात राहिले होते. शाहु महाराजांनी तर राजधानीच जाहीर केली. स्वराज्याचे चार टप्पे आहेत. शहाजीराजेंचा पहिला टप्पा तेव्हा स्वराज्याची पायाभरणी सुरु झाली. 1674 ला शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकानंतरचा एक टप्पा, 1708 ला स्वराज्याचे साम्राज्यात रुपातंर झाले तो एक टप्पा.भोसले कुळाचा इतिहास केवळ ढालतलवारीपुरताच मर्यादीत नाही. तर मातृभक्तीचा इतिहास आहे. स्त्राी सन्मानाचा इतिहास आहे. पितृभक्तीचा इतिहास आहे. ज्ञानाचा, विज्ञानाचाही इतिहास आहे. संभाजीराजेंच्या पत्नी येसूबाई या 28 वर्षे कैदेत होत्या. येसूबाईनी राजारामांना जिंजीला पाठवले. राजाराम महाराजांचा हा प्रवासही वेगळाच आहे. इकडे त्यांनी औरंगजेबाच्या सैन्यातही फुट पाडली. तर शाहु महाराज 18 वर्ष कैदेत होते. जगाच्या पाठीवर एकमेव असा राजा आहे. त्यांनी आपल्या पित्याच्या हत्येचा बदला तीस वर्षांनी घेतला. दिल्लीतच बादशहाचे डोळे काढले. हे उल्लेख छत्रसालच्या पत्रातून आढळतात. पोर्तुगाच्या पत्रातून आढळतात. मुंबई शहराची स्थापना ही शाहु महाराजांच्या भितीने झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
सातारा पंचायत समितीची पुढच्या वर्षीची मासिक सभा राजसदरेवर होणार
किल्ले अजिंक्यताऱयाला अनन्य साधारण महत्व आहे. गेली तीन वर्ष सातारा पालिकेला विनंती करुनही पालिका एक विशेष सभा स्वाभिमान दिनावेळी राजसदरेवर घेत नाही, अशी खंत व्यक्त करत प्रास्ताविकात दीपक प्रभावळकर म्हणाले, गेली आठ वर्ष हा कार्यक्रम होत आहे. ही एक चळवळ आहे. दिर्घकालीन हा कार्यक्रम व्हावा म्हणून हळूहळू सुरुवात होत आहे. हिंदूस्थानाला मोठा इतिहास आहे. अटकेपार झेंडे फडकवले गेले ते याच राजसदरेवरुन दिलेल्या आदेशावरुन.साताऱयाचा अभिमान हा असला पाहिजे. शहरातल्या प्रत्येक वॉर्डात हा स्वाभिमान दिन साजरा झाला पाहिजे, असे सांगत सातारा पंचायत समितीची मासिक सभा पुढच्यावर्षी राजसदरेवर होईल, स्वाभिमान दिवस साजरा होईल, असे त्यांनी सांगितले.
भगवे फेटे अन् सनईचा मंजूळ स्वर
किल्ले अजिंक्यताऱयाचे प्रवेशद्वार फुलांनी सजवण्यात आले होते. राजसदरही सजवण्यात आली होती. सकाळच्या गार वाऱयाला राजसदरेवर मंजुळ सनईच्या सुरात स्वाभिमान दिवसाच्या कार्यक्रमाला आणखी रंगत आणली गेली. उपस्थित मान्यवरांना भगवे पेठे परीधान केल्याने कार्यक्रम भगवा झाला होता. त्यात सुत्रसंचालक सुनील मोरे यांनी वेगळया उंचीवर कार्यक्रम नेवून ठेवला.