ये लावा रे तो बोर्ड …….. सातारा लोणंद राष्ट्रीय महामार्गाचं नवं राजकारण

वाठार स्टेशन :- गेली अनेक वर्षे खड्यात अडकलेला सातारा लोणंद राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त कधी होणार याच उत्तर अजूनही सापडलं नसतानाच या रस्त्याच्या कामावरून सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्ष्यांनी श्रेयवादाची फलकबाजी करीत या रस्त्याच राजकारण सुरू केलं आहे
सातारा लोणंद हा अंदाजे 46 किलोमीटर चा राष्ट्रीय महामार्ग गेली अनेक वर्षे अवजड व् हातूकी मुळे खड्यात गेला आहे याबाबत सर्वच लोकप्रतिनिधीनी पाठपुरावा केल्या नंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणे याच्याकडुन निश्चित झाली आहे
सातारा लोणंद मार्गावरील वाढे फाटा सातारा ते वाठार स्टेशन या 26 किलोमीटर अंतरातील या रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी 24 कोटी रुपयांची निविदा20 मार्च 2020 रोजी यश कन्स्ट्रक्शन लातूर या कंपनीला देण्यात आली आहे मात्र निविदा काढून 7 महिने गेले तरीही या रस्त्याचे काम अजूनही जैसे थे आहे सध्या केवळ मोजणी ची कामे सुरू असल्याचे दिसत आहे
सातारा लोणंद हा 965 डी असा नवीण राष्ट्रीय महामार्ग नावारूपास येत असून या रस्ताची संपूर्ण जबाबदारी ही केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असून त्यास केंद्रीय निधी उपलब्ध आहे असे असताना गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावरील गावागावात या रस्त्याला आम्हीच पाठपुरावा केला असल्याचे फलक झळकत आहेत
कोरेगाव तालुक्यातील जनतेला फलकबाजी नारळ फोडण्याचे कार्यक्रम नवीन नाहीत हे जरी खरं असले तरी सध्या खड्यामुळे सध्या या रस्त्यावरून प्रवास करणं जीवघेण ठरत आहे यातच आता जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू झाल्याने आता या रस्त्याची वाट अजूनच बिकट होणार आहे त्यामुळे केवळ फलकबाजीच राजकारण न करता प्रत्यक्षात हा रस्ता मजबूत होण्यासाठी लोकप्रतिनिधीनी लक्ष दिलं तर ते योग्य होईल अशी अपेक्षा या रस्त्यावरून दरररोज प्रवास करणारा प्रवाशी व्यक्त करत आहे
केवळ आडवा जिरवा धोरण न राबवता राजकारण विरहित कामासाठी एक समस्या म्हणूनया रस्त्याकडे बघणं गरजेच आहे