कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सतिश मर्ढेकर यांची निवड

केळघरःजिल्हा परिषद आरोग्य कमर्चारी आधिकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी जवळवाडी येथील सतीश मर्ढेकर यांची तर उपाध्यक्षपदी तमन्ना काझी यांची सवार्नुमते निवड करण्यात आली आहे.पतसंस्थेच्या नुतन पदाधिका़र्‍यांचे निवडीसाठी सातारा येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात नुकतेच सर्व संचालकांच्या उपस्थितीत वरील निवडी करण्यात आल्या आहेत.यावेळी संचालक शांता पवार,विक्रम खानविलकर, जयप्रकाश पाटील,विठ्ठल ओंबळे,तानाजी सानप, संजय साठे,किशोर काळे,नंदकुमार धुमाळ,सुनील जाधव,हरीदास घुले,रेखा माळके,अलका राऊत ,रोहिणी माने या संचालकांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्षपदी निवड झाल्याबदादल मर्ढेकर यांचा कमर्चारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष काका पाटील,डॉ. राजू कदम, नितीन खटावकर,सुरेश कदम,शांता पवार, इलाही मुलाणी,राजेंद्र कोरे, श्रीरंग गोजसे, अनिल धायगुडे,मधुकर पवार, अनिल शिंदे,लक्षमण खंदारे ,संजीवनी पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना मरढेकर म्हणाले, सर्व संचालकांना बरोबर घेवून पतसंस्थेचा कारभार आदशवत करून पतसंस्था नावारूपाला आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.यावेळी आर.के.पाटील,सुनील भस्मे,राजेद्र शिंदे,सिताराम बनकर ,विशाल रेळेकर, अरविंद गेळे, प्रकाश कदम, शामराव पवार, सुहास पळसापुरे,रविंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. नुतन पदाधिका़र्‍यांचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वसंतराव मानकुमरे, अचर्ना रांजणे, ज्ञानदेव रांजणे, शंकरराव मरढेकर, अनिल कदम यांनी अभिनंदन केले आहे.