कोरोना काळात सामाजिक बांधिलकी ठेवून पत्रकारांचे कार्य मोलाचे- सत्यजितसिंह पाटणकर ; पत्रकारांना केली जिवनाआवश्यक वस्तुंची मदत

 

पाटण :- देशावर पसरलेल्या कोरोनाच्या महाभयंकर संकटात पत्रकार देखील जिवावर उध्दार होऊन सर्व सामान्यांच्या पर्यंत कोरोनाचे अपडेट्स पाठविण्यासाठी आपले कर्तव्य बजावत आहेत. या देशसेवेच्या कर्तव्यात ग्रामीण भागातील पत्रकार देखील कुठे मागे राहिलेला दिसत नाही. हे कर्तव्य बजावत असताना सर्वांचे आरोग्य सुरक्षित रहाण्याचा संदेश समाजातील प्रत्येक नागरीकांपर्यंत तो पोहचवत आहे. समाजातील घटक म्हणून समाज्यासाठी झटणाऱ्या या पत्रकाराकडे समाजाचेच दुर्लक्ष होत असताना. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटण तालुका पत्रकार संघाला जीवनावश्यक वस्तूंची मदत देवून संकट समयी पत्रकारांना मदत केली. पाटण तालुका पत्रकार संघाने हि मदत स्विकारुन त्यांच्या विषयी क्रुत्यज्ञता व्यक्त केली.

यावेळी बोलताना पाटणकर म्हणाले, पत्रकार हा केवळ बातमीसाठी काम करत नसतो तर तो समाजाचा सगळ्यात मोठा आधार असतो, म्हणूनच तो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आज कोरोनामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीतही हा चौथा स्तंभ तितकाच मजबुतीने, खंबीरपणे आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहे. आज हे पत्रकार मित्र कोरोनाविरुद्धच्या लढाई आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणेला मोलाचे सहकार्य करत आहेत. या भीषण संकटातही प्रामाणिकपणे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या या पत्रकारांना मदतीचा हात देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांची सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यासाठी या पत्रकार मित्रांना जीवनावश्यक वस्तू मदत करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ काळे, पाटण तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शंकर मोहिते, विक्रांत कांबळे, सचिव विद्या म्हासुर्णेकर, उपाध्यक्ष पि.के. कांबळे नितीन खैरमोडे, सुरेश संकपाळ, संजय कांबळे, प्रविण जाधव, दिनकर वाईकर, सचिन पोतदार, संदिप भोळे, के.डी. चव्हाण, सुधीर लोहार आदी पत्रकारांची उपस्थिती होती.