विहे सरपंचांचा राष्ट्रवादी प्रवेश विकासाचे पाऊल : – सत्यजितसिंह पाटणकर

 

पाटण :- माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात जो विकास केला तो सर्वज्ञात आहे.1983 पूर्वीचा व आजचा मतदारसंघ याची तुलना होवूच शकत नाही. दादांनी जे-जे केले ते-ते एक कर्तव्य म्हणूनच केले त्यामुळेच नेता आणि जनतेची नाळं अखंड राहिली.तीच आदर्श विचारांची व विकासाची परंपरा आपण अखंडीत ठेवायची आहे. खऱ्या विकासाच्या पाठीमागे जनता उभी राहते याचे उत्तम उदाहरण विहे गावचे सरपंच आनंदराव मोरे यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या भुमिकेचे निश्चित स्वागत असून त्यांच्या व विहे गावच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहू अशी ग्वाही युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिली.

विहे गावचे सरपंच आनंदराव मोरे यांनी आ.शंभुराज देसाई गटाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी विहे गावचे सरपंच आनंदराव मोरे यांच्या सोबत त्यांचे सहकारी सर्जेराव माळी, अक्षय मोरे,विशाल जाधव, युवराज माळी, संभाजी मोरे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सर्व मान्यवरांचा सत्यजितसिंह पाटणकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना सरपंच आनंदराव मोरे म्हणाले, पाटण विधानसभा मतदारसंघ असो किंवा विहे गावचा विकास हा पाटणकर हेच करू शकतात हे आमच्या लक्षात आले. विक्रमसिंह पाटणकर यांचे मार्गदर्शन व सत्यजितसिंह पाटणकर यांचे नेतृत्व मानुन यापुढच्या काळात आम्ही राजकीय व सामाजिक वाटचाल करणार आहोत. विहे गावचा रखडलेला विकास व भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून येथे विकास करण्याचा प्रामाणिक हेतू ठेवून आम्ही हा निर्णय घेतला असल्याचेही सरपंच आनंदराव मोरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी संतोष शेडगे, राहुल पाटील, उत्तम पवार, नंदू साबळे, संभाजी साळुंखे, देवदास माने, शहाजीराव पाटील, रविंद्र पाटील, संभाजी चव्हाण, सुभाषराव यादव,विनायक मोरे,आनंद जंबुरे, शिरीष पाटील, महेश मोरे आदी विहे गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वागत अविनाश पाटील यांनी केले व किरण पाटील यांनी मानले.