बी. एस. येडियुरप्पा यांनी घेतली चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ

बेंगळुर : भाजपाचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांनी शुक्रवारी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गेल्या अनेक अनेक दिवसांपासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर कर्नाटकात पुन्हा एकदा येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांनी तेथील भाजपा कार्यालयात जाऊन अन्य नेत्यांची भेट घेतली.
कर्नाटकातील 17 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर कर्नाटक सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान कुमारस्वामी यांच्यासमोर होते. परंतु कुमारस्वामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करता आले नव्हते. त्यानंतर कुमारस्वामी यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु भाजपाने त्या ठिकाणी सावध भूमिका घेण्याचा निर्णय घेतल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतर गुरुवारी कर्नाटकातील राजकीय नाट्याचा दुसरा अंक पहायला मिळाला होता. विधासनसभेच्या अध्यक्षांनी तीन बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले होते.त्यानंतर शुक्रवारी सकाळीच येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला होता. राज्यपालांनी तो स्वीकारल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळीच त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा निर्णय घेतला. आता 31 जुलैपर्यंत येडियुरप्पा यांना आपले बहुमत सिद्ध करण्याची संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी बंगळुरू येथील भाजपा कार्यालयात काही नेत्यांची भेट घेतली. तसेच त्यांनी बंगळुरू येथील काडू मल्लेश्वर मंदिरात जाऊन पूजाही केली.काँग्रेस- निजद आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले. आज (ता.27) सायंकाळी 6 वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
येडियुराप्पा यांनी आज सकाळी 10 वाजता कर्नाटकचे राज्यपाल राज्यपाल वजुभाई यांची राजभवनवर भेटून सत्ता स्थापनेचा दावा केला. मफआपण राज्यपालांकडे आज शपथविधी सोहळा ठेवावा, अशी विनंती केली. ही विनंती राज्यपालांनी मान्य केली असून तसे त्यांनी मला पत्र दिले आहे.फफ असा दावा येडियुराप्पांनी पत्रकारांशी बोलताना केला.
कर्नाटकातील राजकीय पेचाची गेल्या मंगळवारी अखेर झाली. विश्‍वासदर्शक ठरावावेळी कुमारस्वामी सरकारला पराभव स्वीकारावा लागला. कुमारस्वामी यांच्या सरकारचा शेवट झाल्यानंतर आता भाजपकडून कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.