सातार्‍यात शाही थाटात मिरवणूक

सातारा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक लोकोत्तर युगपुरुष छत्रपती  शिवरायांची 390 व्या जयंतीचा राजेशाही बाज राजधानी शाहूनगरीने अनुभवला. पिढयानपिढया शौर्याची आणि न्यायाच्या लोक कल्याणकारी कल्याणाचा कारभार करणार्‍या युगपुरुषाला ऐतिहासिक सातारा नगरीने विविध कार्यक्रमांतून मानाचा मुजरा केला. सातारा आणि शिवजयंती यांचे अनोखे नाते काय असते हे अनुभवायला मिळाले. 
सातारकरांचे अस्मितेचे ठिकाण असणार्‍या शिवतिर्थावर दिवसभर जणू शिवभकतांचा सागरच लोटला होता. संपूर्ण परिसर विद्युत रोषाणाईने झळाळून गेला होता.
सातारा जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली, पुणे येथून येणार्‍या शिवज्योतींचे शिवतिर्थावर उत्साहाने स्वागत करण्यात येत होते. शिवभक्तांनी पोवई नाक्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सकाळी साडेदहा वाजता खासदार उदयनराजे भोसले नगराध्यक्ष माधवी कदम उपनगराध्यक्ष आज  सातारा नगरपरिषदेमार्फत शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी श्री.छ. शिवाजी सभाग्रहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पोवई नाका येथिल शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास मा.नगराध्यक्षा सौ. माधवी संजोग कदम, मा.उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, पक्ष प्रतोद निशांत पाटील,सभापती मनोज शेंडे, सभापती यशोधन नारकर, सभापती श्रीकांत अंबेकर, सभापती स्नेहा नलवडे, सभापती अनिता घोरपडे, नगरसेवक राजु भोसले,किशोर शिंदे,दत्तात्रय बनकर ज्ञानेश्वर फरांदे, नगरसेविका सुजाता राजेमहाडीक, स्मिता घोडके, सविता फाळके, लता पवार,प्राची शहाणे,मुख्याधिकारी शंकर गोरे,सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सुहास राजे शिर्के स्वीकृत नगरसेवक दत्ता बनकर होते.
राजपथाने अनुभवला साक्षात शिवकाल 
सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात गांधी मैदानावरून भव्य शिवजयंतीच्या मिरवणुकीला खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सुरवात झाली.  पालखी घोडे छत्रचाम रे अब्दागिरी पारंपारिक वेशातील मावळे आणि सुवासिनी यामुळे सातार्‍यात साक्षात शिवकाल अवतरल्याचा भास झाला. शिवकाळातील अनेक प्रसंगांचे वर्णन करणार्‍या चित्ररथांनी सातारकरांचे लक्ष वेधून घेतले होते . मिरवणूक कर्मवीर पथ मार्गे शिवतीर्थावर गेली तेव्हा शिवभक्तांनी मनापासून जल्लोष केला. नगरपालिकेच्या शाळा क्रं 8 तर्फ शिवराज्याभिषेक दिन उत्सवाचा फिरता देखावा सादर करण्यात आला. तसेच जुन्या नगरपालिकेच्या आवारात शिवजयंती निमित्त जुन्या शस्त्रा त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते त्याला शिवभक्तांचा उदंड प्रतिसाद मिळाला. शिव पराक्रमाची साक्ष असणार्‍या प्रतापगडावर सुद्धा विद्युत रोषणाई करण्यात आली होती जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व त्यांच्या सहकार्‍यांनी छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.