वर्धनगडवरती घुमला एकच आवाज…. फक्त शिवराय

पुसेसावळी : आज शिवजयंतीच्या निमित्ताने, प्रेरणादायी वक्ते विशाल सुर्यवंशी यांनी लिहलेल्या फक्त शिवराय या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा किल्ले वर्धनगडवरती संपन्न झाला.  यावेळी पुसेगाव व परीसरातील अनेक शिवजयंती मंडळानी गर्दी केली होती. गडनिवासनी वर्धनीमातेच्या मंदिरात समस्त शिवभक्तांनी शिवज्योत प्रज्वलीत करून एकच जय घोष केला. पुस्तक प्रकाशनच्या निमित्ताने वर्धनगडवरती एकच पर्याय फक्त शिवराय या निनादाने आसमंत दुमदूमून गेला
यावेळी वेद निषद अभ्यासक शंकर निकम म्हणाले लेखक विशाल सुर्यवंशी यांनी आपल्या लेखणीतून प्रेरणादायी शिवराय मोठ्या ताकदीने उभे केले आसून फक्त शिवराय या पुस्तकातील प्रत्येक पानावर रोमांच उभे करणारे शब्द सकारात्मक उर्जा देत आहे. तरी प्रत्येक तरूणांनी हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवायाला काहीच हरकत नाही.
लेखक विशाल सुर्यवंशी म्हणाले शिवराय हे प्रेरणा स्थान असून आज भरखटलेल्या तरूणाईला फक्त शिवराय हे दिपस्तंभासारखे मार्गदर्शन करत आहे. शिवचरित्रात वाद निर्माण करणार्‍या प्रवृत्तीस बळी पडता शिवभक्तांनी डोळसपणे शिवचरित्र अभ्यासावे
यावेळी सरपंच अर्जून मोहीते, जोतिषार्य श्रीराम कुलकर्णी, आर्ट ऑफ लिव्हींगचे विलास चव्हाण, गडसंवर्धक संजयराव जगदाळे, अ‍ॅड.विशाल जाधव, प्रा.अभय जगदाळे, अ‍ॅड. रोहीत कांबळे, सुनिल रणशिंग यांच्यासह शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.