शिवाजी उदय मंडळाच्या तायक्वांदो स्पोर्टस असो.तर्फे खेळाडूंचा गौरव ; विशेष प्रावीण्य दाखवणार्‍या 2 खेळाडूंना मिळणार प्रत्येकी 25 हजार व 10 हजारांचे प्रायोजकत्व

 साताराः  येथील शिवाजी उदय मंडळाच्या तायक्वांदो स्पोर्टस असोसिएशनचे वतीने नुकताच मंडळाच्या सभागृहात तायक्वांदो खेळात विशेष प्रावीण्य मिळवून आपल्या जीवनाचे सार्थक केलेल्या आणि सध्या विविध स्तरावर खेळणार्‍या खेळाडूंचा सत्कार ज्येष्ठ क्रिडा मार्गदर्शक गुरुवर्य बबनराव तथा अण्णा उथळे यांचे हस्ते पुष्पगुच्छ आणि सन्माचिन्हे देउन करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कन्हैय्यालाल राजपुरोहित, उपाध्यक्ष एस.वाय.भगत,संचालक निलेश कुमठेकर,दशरथ निकम संजय पवार आदीची प्रमुख उपस्थिती होती.
 आपल्या प्रास्ताविक भाषणात यावेळी बोलताना कन्हैय्यालाल राजपुरोहित म्हणाले की, सध्या सर्वच खेळांच्या स्पर्धाांचे रुप बदलते आहे. विशेष करुन खेळातील उच्च स्तरावरच्या  स्पर्धांमध्ये आपली खेळाडू मुले केवळ राष्ट्रीय स्तरावर पोहचत आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळात नैपूण्य मिळवण्यासाठी मोठी मेहनत आणि चिकाटीने खेळात सातत्य राखत अभ्यासाबरोबरच खेळालाही वेळ द्यावा लागेल. आज यासाठी पालकांनीही केवळ मुलगा खेळतो त्याला खेळाचा क्लास लावला एवढे करुन भागणार नाही.मुलांच्या शारिरिक,मानसिक प्रगल्भता आणि नव्या उमेदीच्या करिता संघटना सर्वतोपरी झटत आहे. आज संघटनेच्या वतीने 10 वर्षाचा कालावधी पुर्ण केल्याबद्दल तायक्वांदो खेळ खेळणार्‍या अणि त्यात विशेष कामगिरी करणार्‍या खेळाडूला सहा महिन्यांसाठी रुपये दहा हजार आणि वार्षिक कालावधी साठी पंचवीस हजार रुपये प्रायोजीत करणार आहे. या खेळात खेळाबरोबरच आपले मेंटल फिटनेस, प्रिपरेशन, गेम आणि अ‍ॅडव्हान्स्ड स्टडी तितकाच महत्वाचा आहे. विजय खंडाईत सर यासाठी अपार मेहनत आणि कष्ट घेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज संघटनेच्या विविध खेळाडूंनी आपले यश संपादन केले आहे, मात्र एवढ्यावरच समाधान न मानता आपण सर्वांनी मी ही काही तरी करुन दाखवेन ही जिद्द मनात बाळगावी असे सांगितले.
 प्रशिक्षक विजय खंडाईत सरांनी प्रशिक्षणात आपण सर्वांनी सातत्य ठेवावे.10वी नंतर अधिक जोर लावला तर या खेळात आपण उत्तम यश संपादन करु शकाल.नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दंगल चित्रपटातील खेळाप्रमाणेच सध्या सर्वच खेळांची अवस्था आहे. आज आपण खूप खेळलो, देशात असतील तेथे जावून मी विविध स्तराच्या स्पर्धा अनुभवत आहे. जेणेकरुन आपल्या मुलांना याची मोठी मदत मार्गदर्शन करताना होईल.आपल्याकडे साधने सर्व उपलब्ध आहेत. मात्र त्याचा योग्य तो वापर करा,आमच्या कार्यात काही त्रुटी जाणवत असतील तर पालकांनी यासाठी पुढे यावे म्हणजे अधिक चांगल्या प्रकारे आपण ही अधिक चांगला खेळ कराल असे आवाहन आपल्या मनोगतात केले.  या समारंभात संघटनेचे नुकतेच तायक्वंादो खेळातून चुणूक दाखवत त्याचा उपयोग करुन घेत नोकरीस लागलेले सीआयएस एफच्या पीएसआय पदावर नियुक्ती झालेया प्राजक्ता कांबळे, तुषार घोरपडे, पद्मनाभ जाधव, भारती भिसे,यांचे सोबत आपल्या खेळातून राष्ट्रीय तसेच विविध स्तर गाठलेल्या व गौरव मिळवलेल्या राहूल सावंत, अपूर्वा मुंद्रावळे, अंकिता जधाव, यश कदम, मयुरी जाधव, प्राजक्ता पवार, साक्षी विभूते,सिध्दांत सोळंखी,पौर्णिमा कारंडे,अभिषेक लावंघरे, जिग्नेशा गुजर या सर्वांंचा सत्कार गुरुवर्य अण्णा उथळे यांचे हस्ते करण्यात आला.   यावेळी एस. वाय.भगत सरांनी ही मार्गदर्शन केले. दशरथ निकम यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन विजय खंडाईत सर यांनी केेले. समारंभास गौरव झालेया तसेच तायक्वांदो खेळणार्‍या विविध स्पर्धकंाचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.