महाराष्ट्रातील १ ले श्रीशिवकाव्य संमेलन सुंदरगडावर शिव कवीचां उत्स्फुर्त प्रतिसाद..

 

पाटण:- ( शंकर मोहिते ) “सह्याद्रीच्या कुशित शिवबा जन्मला.. गडागडामध्ये शिवनेरी तेजोमय झाला.. कडेकपारी तलवारबाजी दांडपट्टा सजला. हर हर महादेव गरर्जनेने सह्याद्री हसला..” “अनेक झाले पुढेही होतील अगणित ह्या भुमिवरती.. जाणता राजा एकच झाला तो फक्त ” राजा शिव छत्रपती..” “हा मुजरा मानाचा आपल्या महान छत्रपती राजाला.. चला देऊया सलामी आपल्या भगव्या झेंड्याला..” अशा अनेक शिव कविच्यां शिवकाव्यांनी पाटण महालातील सुंदरगड छत्रपती शिवकाव्यमय झाला होता. देशातील व महाराष्ट्रातील ‘१ ले श्रीशिवकाव्य संमेलन’ नुकतेच सुंदरगडावर साजरे झाले. या श्रीशिवकाव्य संमेलनाला कवींचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
स्वराज्यावर चालुन आलेला अफजल खानाचा वद छत्रपती शिवाजी महाराजांनी १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी केल्यानंतर केलेल्या दक्षिण मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांनी १५ नोव्हेंबर १६५९ रोजी सुंदरगड स्वराज्यात सामिल करुन घेतला. याची आठवण कायम ताजी राहावी या अनुषंगाने देशातील व महाराष्ट्रातील ‘१ ले श्री शिवकाव्य संमेलन’ पाटण महालातील किल्ले सुंदरगडावर गुरवार दि. १५ नोव्हेंबर रोजी संपन्न झाले. या काव्य संमेलनाला छत्रपती शिवकवी व छत्रपती शिव शाहीरी यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या दिवशी सुंदरगड शिवमय झाला होता. भगव्या पताकांनी सुंदरगड सजला होता.
स्पर्श तुझा या मातीला सह्याद्रीच्या देवा..
म्रुदू लत्तेतील शिवस्पर्शाचा टिळा भाळी ल्यावा..
गड किल्ल्या मधिल तटबुरजांनो.. बंदी वाडे अन तोफांनो ध्वनी विरलेला शिवरायांचा मज पामरा ऐकवांना… कवी अनिल बोधे यांनी शिवस्पर्शाचा टिळा लावल्यानंतर “रायगडावर घडला सोहळा देव हि आले धरतीवर माझ्या शिवबाचा डंका वाजतो अजुन साऱ्या दुनियेभर..” कवी मनोहर यादव यांनी शिवबाचा डंका दुनियेभर वाजविला. तरुणानां व्यसनमुक्तीचा संदेश देत कवी काशिनाथ विभुतेनीं “टाक हातातला गुटखा.. आर मर्दा चल गडावर. आपण सारे शिवरायांचे मावळे नाही नुसते नटवे कावळे.. शिवनामात, शिवकामात रिकामा वेळ घालवू.. शिवसंस्काराचा गाडा सप्रेमाने चालवू.. “वेड लागल.. वेड लागल.. सुंदरगड संवर्दनाच वेड लागल…” कवी शंकर मोहिते यांनी गड किल्ले संवर्दनाचा संदेश आपल्या कवीतुन नवतरुणानां दिला.अशा एकशे एक बडकर श्रीशिवकाव्य सादर झाले.
यावेळी कवी विद्या म्हासुर्णेकर-नारकर, यसुफ हकिम, सागर पोतदार, दादसो पवार, किरण पवार, दादासो सांवत, पंतगराव घाडगे, आदी कवीनीं कवीता सादर केल्या. तर बाळासाहेब पवार, चंद्रहार निकम, संजय इंगवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर यावेळी यशवंतराव जगताप, धैर्यशिल पाटणकर, नितीन खैरमोडे, सुरेश संकपाळ, शंकरराव कुंभार, निलेश फुटाने, लक्ष्मण चव्हाण, अनिस चाऊस, राजेंद्र सांळुखे, अविनाश पराडकर, महादेव खैरमोडे, नामदेव कुंभार यांच्यासह कवीश्रोत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.