पवारसाहेबांच्या त्या विधानाबाबत आ. गोर्‍हे यांनी सातार्‍यात मांडली भूमिका

????????????????????????????????????

सातारा : भारिप बहुजन महासंघाने राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यास इन्कार केला. त्यामुळे 1989 च्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ नमुद करून तत्कालीन भारिप बहुजन महासंघाचे निलम गोर्‍हे यांच्या उमेदवारी मुळे भाजपला फायदा झाला.असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते.त्या विधानाबाबत आ. गोर्‍हे यांना सातार्‍यात पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सावधपणे भूमिका मांडली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमानिमित्त जेष्ठ नेते शरदचंद्र पवार व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर सातार्‍यात आले होते. त्याच वेळी विधान परिषद विशेषाधिकार समिती अध्यक्षा निलम गोर्‍हे यांच्या समवेत समिती सदस्य सुद्धा सातार्‍याला आले होते.
यावेळी सातार्‍यात समितीच्या कामकाजाची माहिती दिल्यानंतर आ गोर्‍हे यांना काही पत्रकारांनी जेष्ठ नेते शरद पवारांनी केलेल्या विधानाबाबत विचारणा केली. त्यावेळी आ. गोर्‍हे यांनी सांगितले की,1989 साली लोकसभा निवडणुकीत उत्तर मुबंई मतदारसंघातून भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार म्हणून मला 1 लाख 10 हजार मते मिळाली होती. तर भाजपच्या जयंतीबेन मेहता या मताधिक्याने निवडून आल्या होत्या. या गोष्टीला आता बराच काळ लोटला आहे. पण, त्यानिमित्त शरद पवार साहेबांनी आठवण काढली. याचे समाधान वाटत आहे.तसेच पवारसाहेवांनी मदत केली असून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठांन मध्ये ही काम केले आहे.असे सांगून आ .गोर्‍हे यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.