श्‍लोक घोरपडे एमआरएफ गॉडस स्पीड सुपर क्रॉस राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमाकांचा विजेता

साताराः येथील शामसुंदरी चॅरिटेबल रिलीजीएस सोसायटीच्या के.एस.डी.शानभाग विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या इ.7 वीत शिकणार्‍या श्‍लोक विक्रम घोरपडे यांनी मोटोक्रॉस राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
तामिळनाडू येथील कोईमतूर येथे मागील रविवारी 26 मे रोजी झालेल्या स्पर्धेत प्रथम फेरीत गॉड स्पीड एमआरएफ गॉडस स्पीड मोग्रीप सुपर क्रॉस नॅशनल चॅम्पियन शीप 2019 मध्ये त्याने हे प्राविण्य मिळवले आहे. याच स्पर्धेत याच शाळेत शिकणारा ई क्षण संकेत शानभाग हा तिसर्‍या क्रमाकांने विजयी झाला आहे.
श्‍लोक घोरपडे व ईक्षण शानभाग यांनी अतिशय लहान वयात अशा मोटोक्रॉस स्पर्धेतील विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या दोघांना त्यांचे आजोबा व सातारा जिल्हयातील क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश शानभाग यांनी सरावासाठी विशेष ट्रॅक पाटखळ माथा येथे बनविला आहे.
चित्तथरारक हवेत उंच उडया घेत सादर केली जाणारी प्रात्यक्षिके दाखविण्यात ईक्षण व श्‍लोक हे अतिशय तरबेज असून देशात विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धामधे अतिशय लहान वयात त्यांनी मिळवलेले यश व केलेली कामगिरी खरोखरच अभिनंदनीय व कौतूकास पात्र ठरणारी आहे. या यशाबद्दल श्‍लोक घोरपडे व ईक्षण शानभाग यांचे क्रिडा मार्गदर्शक रमेश शानभाग, संकेत शानभाग, सौ.उषा शानभाग, केएसडी शानभाग विद्यालयाच्या संचालिका सौ. आंचल घोरपडे, मुख्याध्यापिका सौ. रेखा गायकवाड, मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी, सर्व शिक्षक शिक्षिका पालक संघाचे प्रतिनिधी यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.