खटाव तालुका दुष्काळी यादीतून वगळल्याने सामाजिक कार्यकर्त्यांचे शोले स्टाईल आंदोलन ; रात्री उशिरापर्यंत आंदोलनकर्ते टाकीवर ; जिल्हाधिकारी न आल्याने वातावरण तणावपूर्ण

 

वडूज / प्रतिनिधी :- खटाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना प्रशासनाने खटाव तालुक्यला दुष्काळी यादीतून वगळल्याने वडूज सह तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते यांनी अचानक गमिनी काव्याने येथील पाण्याच्या टाकीवर शोले आंदोलन केले.
दरम्यान आमची बाजू एकूण घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देण्याची मागणी आंदोलनकर्ते यांनी केली. मात्र उपस्थित असलेल्या प्रशासनांकडून जिल्हाधिकारी मिटिंग मध्ये असल्याचे सांगण्यात आले.
सकाळी 11वाजल्यापासून हे आंदोलन सुरू होते. दिवसभर तालुक्यातील राजकीय नेते व काही पदाधिकारी या ठिकाणी भेट देत होते. यावेळी सामाजिक संघटनेमध्ये येथील शहाजीराजे गोडसे मित्रमंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अभेद सामाजिक संघटना, मानवाधिकार संघटना यांच्यासह अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान अचानक झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. तर आंदोलनस्थळी रुग्ण वाहिका सह मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा, खटाव तालुक्याचा यादीत समावेश झालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
विशेषतः हे आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळताच प्रशासनाकडून उपजिल्हाधिकारी संजय पाटील अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड,जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा शिंगण यांच्या सह काही वरिष्ठ अधिकारी यांच्यात रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. मात्र जिल्हाधिकारी यांच्याशीच आम्ही चर्चा करणार असल्याचा पवित्रा आंदोलन कर्त्यांनी शेवटपर्यंत घेतला होता.
घोषणाबाजी करत ढोलताशांच्या आवाजात हे आंदोलन होत असल्याची चर्चा परिसरात वाऱ्यसारखी पसरताच तालुक्यातून अनेक नागरिकांनी याठिकाणी हजर होते. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू असून ही प्रशासनाकडून म्हणावी अशी ठोस तोडगा निघत नव्हता. यामुळे वातावरण जास्तच तणावपूर्ण होते.
दरम्यान यावेळी या आंदोलनस्थळी श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, माजी आमदार डॉ दिलीप येळगावकर, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी सभापती संदीप मांडवे, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वोगोड , स्वाभिमानाचे राज्य प्रवक्ते अनिल पवार आदी सह विविध पक्ष्याच्या पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी भेटी दिल्या.
मागण्या पूर्ण होत नसल्याचे लक्षात आल्याने आंदोलन कर्त्यांनी हे आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू होते.