श्री सेवागिरी यात्रेनिमित्त बुंदी महाप्रसाद तयारीला सुरवात

पुसेगांव : श्री सेवागिरी यात्रेमध्ये भाविकांना देण्यात येणार्‍या बुंदी प्रसाद तयार करण्याठी भट्टी पुजनाने सुरवात झाली. लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणारे प.पु.श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेत मध्ये श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने भाविकांना बुंदीचा प्रसाद वाटण्यात येतो.
मठाधिपती सुंदरगिरी महाराज, विश्वस्त योगेश देशमुख यांच्या शुभहस्ते भट्टीचे पुजन करण्यात आले. त्यानंतर बुंदीचा प्रसाद तयार करण्यास सुरवात झाली. यावेळी बाळासाहेब जाधव, रघुनाथ दळवी, विठ्ठल तोडकर, अमित जाधव, आकाश जाधव याच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते