स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचे लिखाण करणाऱ्या शुभा साठे यांचा पाटण येथे जाहिर निषेध…..

 

पाटण:- स्वराज्य रक्षक, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बध्दल आक्षेपहार्य चुकीचे लिखान करुन संभाजी महाराज यांचा खोटा इतिहास पसरवणाऱ्या लेखिका शुभा साठे या स्वराज्य विरोधक, धर्मविरोधक देशद्रोही असुन यांच्या खोट्या इतिहासाचा सर्व शीक्षा अभियिनाच्या पाठ्यपुस्तकात समावेश करणारे सरकार देखिल देशद्रोहीच आहे. अशा सरकारचा आणि लेखिका शुभा साठे यांचा पाटण येथे जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला.
श्री रामदास समर्थ स्वामी, या पुस्तकात छत्रपती संभाजी राजां विषयी डॉ. शुभा साठे या लेखिकेने चुकिचे लिखाण केले आहे. आणि हे चुकीचे लिखाण असणारे पुस्तक ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकाचा समावेश महाराष्ट्र सरकारने सर्व शिक्षा अभियानाच्या पाठ्य पुस्तकात केला आहे. या पुस्तकातील पान क्रमांक १८ वर संभाजी महाराजांविषयी उल्लेख आहे. सर्व शिक्षा अभियानाकडून छत्रपती संभाजी महाराजांना मद्यपी ठरवण्याचा शुभा साठे आणि या सरकारचा हा कट आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे युवकांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व अवघ्या ३२ व्या वर्षी स्वराज्य रक्षणासाठी स्वतःच्या देहाचे त्यांनी बलिदान देऊन या स्वराज्याचे रक्षण केले. त्या संभाजी महाराज यांची बदनामी महाराष्ट्र शासनाने अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या पुस्तकात करण्यात आली. हि बाबच निषेधार्य आहे. हे पुस्तक शाळेतील लहान मुलांना वाचवयास सरकार ने सर्वशिक्षा अभियाना अंतर्गत अभ्यासक्रमात समाविष्ट केले होते. म्हणजे लहान मुलांना संभाजी महाराजांच्या विषयी द्वेष भावना शिकवण्याची यांची चाल होती. छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी या शुभा साठे व त्यांच्या पिल्लावळीने आणि सरकारने जाणून बुजून केली आहे. या प्रकाराचा समस्त पाटण वाशिय, शिवजयंती उत्सव समिती, सुंदरगड सवर्धन समिती, शिवसक्षम ट्रस्ट जाहिर निषेध व्यक्त करुन शुभा साठे आणि त्यांना साथ देणाऱ्या सरकारवरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी यशवंतराव जगताप, संजय इंगवले, सुरेश पाटील, चंद्रहार निकम, चंद्रकांत मोरे, बाळासाहेब पवार, शंकर मोहिते, शंकरराव कुंभार, महादेव खैरमोडे, लक्ष्मण चव्हाण, निलेश फुटाणे, विक्रम यादव, नामदेवराव कुंभार, अधिक भिसे यांच्यासह पाटण वाशिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.