सांस्कृतिक परंपरा जपलीतरच नवीन पिढीला संस्कृती कळणार :- विक्रमसिंह पाटणकर

 

पाटण:- ( शंकर मोहिते ) – या देशाला आणि राज्याला धार्मिक, आद्यात्मिक आणि एकात्मिक परंपरा आहे. हि परंपरा जोपासून गणेश उत्सव सारखा एकात्मिक उत्सव आज देशभरातच नव्हेतर जगभरात साजरा केला जातो. अशा उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येऊन समाज प्रबोधात्मक कार्यक्रमाच्या स्पर्धा राबवून केलेले कार्य हे सामाजिक कार्यच आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज २४ * ७ फाँऊडेशन च्या वतिने आयोजित गौरी – गणपती देखावा स्पर्धेच्या बक्षिस समारंभ प्रसंगी केले.
यावेळी पाटणचे तहसिलदार रामहरी भोसले, समर्थ सुहास चैरिटेबल स्ट्रटच्या अध्यक्षा सौ. शुंभागी घाडगे, डि.के. सामाजिक ग्रुपचे अध्यक्ष दादासाहेब खांडके, श्रीमती सुहासनी पिसाळ, श्रीमंत छत्रपती उदयनराजे २४*७ फाँऊडेशनचे पाटण तालुका अध्यक्ष नितीन पिसाळ, सिनेअभिनेते संतोष पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
‌ या कार्यक्रमात विक्रमसिंह पाटणकर यांच्या हस्ते पाटण शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उत्क्रुष्ठ समाज प्रबोध्दन देखावा साकारणाऱ्या समाज सेवा संघ मोरेगल्ली या मंडळाला प्रथम क्रमांकाचे पारितोषक देण्यात आले. व्दितीय क्रमांकाचे पारितोषक प्रताप सेवा मंडळ झेंडा चौक यांना देण्यात आले. तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषक शिवलिंग ग्रुप श्रीमंत दादासाहेब पाटणकर नगर यांना देण्यात आले. तर उत्तेजणार्थ रणजित सेवा मंडळ आणि शिवाजी उदय मंडळ यांना देण्यात आले.
घरगुती गौरी – गणपती सजावट देखाव्या मधे सौ.सिमा सतिश पाटील, सौ. बकुल अजितसिंह पाटणकर यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. सौ. सुनिता सुनिल मोरे यांना व्दितीय, सौ.स्वाती राजेंद्र देसाई यांना तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. तर उत्तेजणार्थ सौ. भोज आणि सौ. भाग्यश्री नरेंद्र कुंभार यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी पाटण तालुका पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी अध्यक्ष-भगवंत लोहार, उपाध्यक्ष- नितीन खैरमोडे, दिनकर वाईकर, सचिव- सौ.विद्या म्हासुर्णेकर-नारकर, माजी अध्यक्ष-शंकर मोहिते, पत्रकार मिलिंद पवार, सुरेश संकपाळ, संजय कांबळे, प्रकाश कांबळे, यांचा सत्कार करण्यात आला. तर शैक्षणिक क्षेत्रात उज्वल यश संपादन करणाऱ्या यशस्वी विद्यार्थांनचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि प्रास्ताविक संजय इंगवले यांनी केले. कार्यक्रमास धर्यशिल पाटणकर, विलासराव क्षीरसागर, डाँ. चंद्रकांत यादव, सौ. आयेशा सय्यद, सौ. शिलादेवी पाटणकर, सौ. सोनाली खैरमोडे आदी मान्यवरांसह गणेश मंडळांचे कार्यकर्ते पदाधिकारी, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या बक्षिस वितरण कार्यक्रमानतंर “सोनू तुला माझ्यावर भरवसा नाहिका?” हा संतोष पवार दिग्दर्शिक विनोदी नाटकाचा प्रयोग झाला.