श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर अमृतमहोत्सव सोहळ्याला शरद पवार यांच्यासह दिग्गजांची गर्दी होणार.

 

पाटण दि. १९ ( शंकर मोहिते ) पाटण तालुक्याचे भाग्यविधाते व महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनात मतदारसंघाचे रूप पालटले आहे कोणतीही अपेक्षा न ठेवणाऱ्या या लोकनेत्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा अमृतमहोत्सव गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री खा. शरदचंद्रजी पवार यांचेसह देश, राज्य आणि जिल्ह्यातील दिग्गज मान्यवर नेते, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत. आसल्याची माहिती अमृतमहोत्सव गौरव समितीचे अध्यक्ष व पाटण पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना राजाभाऊ शेलार पुढे म्हणाले. श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांनी आपल्या राजकीय करकिर्दित सर्वच मतदारसंघात सर्वांगीण विकास केला. खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपली यशस्वी राजकीय व सामाजिक वाटचाल केली. तालुक्यातील धरणे, साखर कारखाना, सहकारी शैक्षणिक व अन्य संस्था, सिंचन व्यवस्था, पर्यटन विकास केला. तालुक्यातील डोंगर द-यातील वाडी वस्तीवरील अवघड घाट रस्ता फोडून दळणवळणासाठी रस्त्याचे जाळे विणले अषा उत्तुंग कार्य करणा-या नेत्याचा महासन्मान हा खा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्तेच व्हावा ही तालुक्यातील सर्वांचीच अपेक्षा होती. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी खा. शरदचंद्रजी पवार यांचेसह विधान परिषद सभापती ना. रामराजे निंबाळकर, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले , खा. विजयसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. सुनिल तटकरे, आ. हसन मुश्रीफ, माजी मंत्री विलासराव पाटील, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. आनंदराव पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. दिपक चव्हाण, सातारा जि.प. चे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आजी, माजी खासदार, आमदार, पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत.
या अमृतमहोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने पाटण विधानसभा मतदार संघात अनेक कार्यक्रम, स्पर्धा धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय हॉलीबॉल, कबड्डी, कुस्ती, शरीर सौष्ठव स्पर्धा, रक्तदान व आरोग्य शिबिरे, फळे वाटप, आदी बहुसंख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मंगळवार दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पाटण येथील बाळासाहेब देसाई कॉलेजच्या प्रांगणात हा अमृतमहोत्सव गौरव सोहळा आयोजित करण्यात आला असून यावेळी सर्वांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही शेवटी राजाभाऊ शेलार यांनी केले. यावेळी युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दिनकरराव घाडगे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, तालुका दूध संघाचे अध्यक्ष शंकरराव जाधव, सुभाषराव पवार, नगराध्यक्षा सौ. सुषमा महाजन आदींची उपस्थिती होती.