राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड 

सातारा : जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय टेबल टेनिस (14 वर्षाखालील मुलींमध्ये क्रिडा स्पर्धामध्ये सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थीनी कु. सिध्दी सागर निंबाळकर ही विजयी झाली असून चंद्रपूर येथे होणार्‍या राज्य स्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी ती चंद्रपूरला रवाना झाली आहे.
तिला प्रशिक्षण ललित सातघरे व वाय. डी. जाधव सर यांनी मार्गदर्शन केले. माजी आ. सदाशिवराव सपकाळ, शिवसेना नेते नरेंद्र पाटील, बिल्डर्स असो. चेअरमन सयाजी चव्हाण, मुख्याध्यापिका एस. एस. कुलकर्णी यांनी तिचे अभिनंदन केले.